Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदार यादीतील दुबार नावांचं करायचं काय? पुणे महापालिका प्रशासनापुढे प्रश्न; निवडणूक आयाेगाला आयुक्तांची विनंती

मतदार यादीत असलेल्या दुबार नावांचे करायचे काय ? असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सुचना कळवाव्या अशी विनंती महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणुक आयाेगाला केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2025 | 02:40 PM
मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; 'बोगस' मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; 'बोगस' मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

Follow Us
Follow Us:
  • मतदार यादीतील दुबार नावांचं करायचं काय?
  • महापालिका प्रशासनापुढे प्रश्न
  • निवडणूक आयाेगाला आयुक्तांची विनंती
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यातच होणार आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीसाठी जरोदार कामाला लागले आहेत. अशातच आता पुण्यातील मतदार यादीत असलेल्या दुबार नावांचे करायचे काय ? असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सुचना कळवाव्या अशी विनंती महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणुक आयाेगाला केली आहे.

पंधरा दिवसांपुर्वी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर झाली. या मतदार यादीत तीन लाखाहून अधिक मतदारांची नावे दुबार आहेत. या दुबार नावांचे काय करावे असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. ही नावे वगळणे आवश्यक आहे, त्यापार्श्वभुमीवर राज्य निवडणुक आयाेगाच्या आढावा बैठकीत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशाेर राम यांनी प्रश्न उपस्थित केला. पुण्यात तीन लाखाहून अधिक नावे दुबार आहेत, तर काही नागरीकांनी, लाेकप्रतिनिधींनी दुबार नावे शाेधून काढली आहेत. त्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या अधिक असू शकते. या नावांचे काय करायचे याविषयी मार्गदर्शन करावे, अशी विनंती आयुक्त नवल किशाेर राम यांनी आयाेगाकडे केली.

राज्यातील इतर महापालिकांच्या मतदार यादींविषयी आलेल्या तक्रारींची दखल घेता, पुण्यातील स्थिती समाधानकारक असल्याचे आयुक्त नवल किशाेर राम यांनी पत्रकारांना सांगितले. इतर महापालिकांत एक लाखाहून अधिक हरकती नाेंदविल्या गेल्या आहेत. लाेकसंख्या, मतदारसंख्येचा विचार करता, पुण्यात स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या दुबार मतदारांनी दाेन वेळा मतदान करू नये अशी अपेक्षा आहे, त्यासंदर्भात आवाहन करावे लागेल. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे लागणार आहे. याद्या तयार करण्याचे काम महापालिका करीत नाही, निवडणूक आयाेगाकडून आलेल्या मतदार याद्यांचा उपयाेग करावा लागताे. काेणाचेही नाव घालणे किंवा वगळण्याचा अधिकार महापालिकेला नाही. काही मतदारांची नावे आहे, परंतु पत्ता नाही अशा ठिकाणी ब्लाॅक निहाय यादीत ही नावे ठेवली जातील.

बारा हजाराहून अधिक हरकतींवर दुरुस्ती !

महापालिकेच्या प्रारुप मतदार यादींवर सुमारे बावीस हजाराहून अधिक हरकती आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. आजपर्यंत बारा हजाराहून अधिक हरकतीनुसार यादी दुरुस्त केल्या आहेत. उर्वरीत हरकतींवरील कार्यवाही ७ डिसेंबरपर्यंत पुर्ण केल्या जातील. याद्यांमध्ये त्रुटी राहणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे, असा दावाही आयुक्त नवल किशाेर राम यांनी केला आहे.

Web Title: There are duplicate names in the voter list for the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Election News
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.