
Pune News, Maval News, Talegaon Dabhade, Congress, Amit Shah, Maharashtra Politics
या पत्रकार परिषदेत डॉ. विशाल वाळुंज म्हणाले की नॅशनल हेवी इंजीनियरिंग च्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तळेगाव दौऱ्याच्या वेळी पुणे,(उमेश पवार )देहू रोड (मलिक शेख ) तळेगाव दाभाडे ( डॉ. विशाल वाळुंज )या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिवसभर पोलिसांच्या ताब्यात का ठेवले? पोलिसांच्या कारवाईवर पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केले? राज्यात लोकशाही जिवंत राहिलेली नाही. भाजप सरकार काँग्रेसला का घाबरत आहे? पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने पोलीस प्रशासनावर एवढा दबाव आहे का? हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.. दौऱ्याच्या प्रसंगी काळे झेंडे दाखवले जातील का या भीतीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते असेही ते म्हणाले. पक्षाच्यावतीने वृक्षतोड, गोकुळ दूध संघातील निवडणूक, मतचोरी यांविषयी विचारणा केली जाणार होती. ”
ते पुढे म्हणाले की,” नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या पुन्हा सुरू होण्याआधी या कंपनीने नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांची थकबाकी पूर्ण केली आहे का? कंपनी सुरू झाल्यानंतर रोजगार उपलब्ध किती होणार? मावळ तालुक्यातील हया कंपनीतील जे कामगार ह्यातीत नाहीत त्यांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. तसेच जुन्या कर्मचाऱ्यांची थकबाकी पूर्ण करावीत. याचा विचार सरकारने करावा अशी मागणी पक्षाच्यावतीने केली आहे.
तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ हे म्हणाले की, “विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोडीमुळे दुर्मिळ पशुपक्षी नष्ट होणार आहेत. हे थांबले पाहिजे. तसेच काँग्रेस पक्ष चांगल्या कामांना पाठिंबा देत आहे. कोणत्याही पक्षाच्या सभा असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका. वृक्षतोड, मत चोरी यांसारख्या विषयांवर विचारणा करणे चुकीचे आहे का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Sambhajinagar News : पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार; कारमध्ये सापडला कोडेन सिरपचा मोठा साठा
देहू रोडचे शहराध्यक्ष मलिक शेख म्हणाले की शहांच्या दौऱ्याच्या वेळी काळे झेंडे दाखवले जातील या भीतीने . पोलीस प्रशासनाने नोटीसा देऊन दिवसभर ताब्यात ठेवले. अत्यंत चुकीचे आहे. अखेर एवढी खबरदारी नेमकी कशासाठी ठेवली होती. सन 2019 मध्ये अरबी समुद्रात भूमिपूजन होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. सरकार कामांचे उद्घाटन करत आहेत पण कामे पूर्ण होत नाहीत. “