Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2025: ‘माझा विठ्ठल, माझी वारी’; परंपरागत आषाढी वारीला तरुणांनी दिला नवा आकार

तरुण वारकऱ्यांचा सहभाग हा केवळ वारीचा बदलता चेहरा नाही, तर ही आपल्या संस्कृतीची पुनर्भेट आहे. वारीत त्यांचं चालणं म्हणजे एका नव्या अध्यात्मिक चैतन्याचा प्रसार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 21, 2025 | 08:07 PM
Ashadhi Wari 2025: ‘माझा विठ्ठल, माझी वारी’; परंपरागत आषाढी वारीला तरुणांनी दिला नवा आकार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/वैष्णवी सुळाके: पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या आषाढी वारीला यंदा एक वेगळीच ऊर्जा लाभली आहे. ती म्हणजे नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग. पारंपरिक भक्तिरसात चिंब भिजलेल्या या वारीत यंदा शेकडो तरुण–तरुणी ‘माझा विठ्ठल, माझी वारी’ म्हणत तन-मनाने सामील झाले आहेत. केवळ चालण्यापुरता हा प्रवास नाही.  तरुणांच्या पावलांमध्ये सामाजिक जाणिवांचा, पर्यावरण जागरूकतेचा आणि सेवाभावाचा ठसा उमटताना दिसतो आहे. तरुणांनी आपली जीवनशैली, स्वप्ने आणि श्रद्धा यांचा संगम करून परंपरागत वारीला नव्याने आकार दिला आहे.

पुण्यातील आय टी, वैद्यकीय, कला आणि शिक्षण क्षेत्रातील तरुणांनी पालखी सोहळ्यात आपले योगदान प्रामाणिकपणे दिले. कुणी सोशल मीडियावरून वारीचा अनुभव जगासमोर मांडतो आहे, तर कुणी वारी मार्गावर रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलतो आहे.
या वारीत त्यांच्यासाठी कोणताही दिखावा नाही, प्रसिद्धीची हाव नाही आहे ती केवळ माऊलीचे नामस्मरण, संतांच्या विचारांशी एकरूप होण्याची तळमळ. ‘तुका म्हणे ध्यानाची ठेवावी ध्यानें | विठोबा नाम घेता अंतःकरणें…’ या संतवचनांचा अनुभव या तरुणांच्या कृतीतून प्रत्ययास येतो.

तरुण वारकऱ्यांचा सहभाग हा केवळ वारीचा बदलता चेहरा नाही, तर ही आपल्या संस्कृतीची पुनर्भेट आहे. वारीत त्यांचं चालणं म्हणजे एका नव्या अध्यात्मिक चैतन्याचा प्रसार आहे. आजच्या धकाधकीच्या युगातही श्रद्धेची आणि सेवाभावाची ज्योत तेवत ठेवणारी ही तरुणाई, वारीच्या वाटेवरून चालतच नव्हे तर समाजमनातही अध्यात्माचा नवा मार्ग शोधत आहे. या पवित्र वारीत सहभागी होणं म्हणजे केवळ पंढरपूरला जाणं नाही, तर स्वतःच्या अंतर्यामीच्या विठ्ठलाला जागं करणं. म्हणूनच, या तरुणांनी आपल्या पायवाटेने, प्रेमाने आणि सेवाभावाने संपूर्ण वारीला एक नवा अध्यात्मिक अर्थ दिला आहे.

पुण्यनगरी होतीये सज्ज! वारकऱ्यांच्या निवासाची जय्यत तयारी; महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अन् सुविधा

माझी विठ्ठलावर खूप भक्ती आणि श्रद्धा आहे. गेल्या 6 वर्षांपासून मी पायी वारी करत आहे. वारीच्या माध्यामातून परमेश्वराची साक्षात भेट होते. वारीला जाणे म्हणजे स्वर्ग सुख आहे. यामाध्यमातून इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते.

– हर्ष गरुड, पुणे

वारी मला शिकवते की नम्रता म्हणजे खरी भक्ती. हजारो लोकांमध्ये चालताना आपण एक सामान्य वारकरी होतो, पण विठ्ठलाच्या दृष्टीने आपण सगळेच प्रिय असतो हीच अनुभूती मला दर वारीत मिळते. त्यामुळेच 3 वर्षांपासून मी वारीत चालतो आणि यापुढेही जात राहीन.

– तुषार कोल्हे, नाशिक

23 वर्षांपासून मी अखंडित पायी वारी करतोय. लहानपणापासूनच आजी-आजोबा मला घेवून जायचे. मला वारीतील चैतन्य मनाला हवेहवेसे वाटते. माऊलींच्या नामात इतकं समाधान आहे, की जगातल्या कोणत्याही गोष्टीची हाव उरत नाही. हे समाधान मला मिळते.

Ashadhi Wari 2025 : वरूणराजाने जोरदार सलामी देत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला दिली साद, होणार प्रस्थान

– बाळासाहेब धुमाळ, अकोला

आयुष्यात एकदातरी वारी करायची हे माझे ठरले होते. त्यामुळे मी यंदा पायी वारी करत आहे. टाळ, मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी नव्या ऊर्जेने ह्या सोहळ्यात दंग होतात. सर्व दुःख बाजूला सारून माऊलींचा गजर करतात. ही खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे हा सर्व सोहळा, भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी मी पायी वारी करत आहे.

-प्रियांका दिघोळे, परभणी

माझे पायी वारीचे हे तिसरे वर्ष आहे. विठू-माऊलीवर माझी खूप श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यामुळे मी वारीला जातो. वारी म्हणजे माझ्यासाठी आत्मशोधाचा प्रवास आहे.

– मंगेश दरवडे, सोलापूर

Web Title: This year there was a large participation of youth in the ashadhi wari 2025 pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 08:07 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • pandharpur
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले
1

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी
2

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास
3

ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन
4

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.