Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हशीची अवैध वाहतूक करणारे तिघे गजाआड, २३ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, काही अंतरावर कंटेनर चालकाने कंटेनर सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर कंटेनरच्या केबीनची पाहणी केली असता कंटेनर मध्ये संबधीत दोन आरोपी आढळले. सदर कंटेनरची पंचासमक्ष पाहणी केली असता आतमध्ये लहान - मोठे म्हशीचे पारडे/रेडे असून ४९ जनावरे अतिशय निदर्यतेने चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबून असल्याचे आढळून आले.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 08, 2022 | 03:54 PM
Three persons involved in illegal transportation of buffaloes were seized, while goods worth Rs 23 lakh 49 thousand were seized

Three persons involved in illegal transportation of buffaloes were seized, while goods worth Rs 23 lakh 49 thousand were seized

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : नागपूर पांढरकवडा मार्गे हैदराबादकडे कत्तलीसाठी जात असलेल्या म्हशीची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये चार लाख ४९ हजार रुपयाची जनावरे व ट्रक १९ लाख असा एकूण २३ हजार ४९ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई ७ एप्रिलला पहाटेच्या सुमारास पांढरकवडा पोलिसांनी केळापूर टोल नाका परिसरात केली. तालीब निज्जर मेहु, (वय २२) रा. राजपूर, ता. पुन्हाना, जि. नुहु राज्य हरियाणा व त्याचे साथीदार आसिफ एहसान कुरेशी (वय ३०) व कासिम अब्दुल गफार, (वय २२) दोन्ही (रा. पुराना कसबा, केतीपुरा मोहल्ला, बागपत, जि. बागपत, उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिस सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार, पांढरकवडा पोलिसांचे पथक पोलिस ठाण्यात हजर असतांना गोपनिय माहिती मिळाली की, पांढरकवडा मार्गे हैद्राबाद कडे एका कंटेनर मध्ये जनावरे अवैधरित्या कोंबून कत्तलीकरिता घेवून जात आहे. या माहितीवरून पोलिसांनी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमराज कोळी हे आपल्या पथकासह शासकीय वाहनाने रवाना होवून पांढरकवडा येथील राष्ट्रीय महामार्ग ४४ येथे नागपूर करून अदिलाबाद कडे जाणाऱ्या वाय पॉईंट येथे सापळा रचला. 
[read_also content=”भंडारा जिल्ह्यातील जांब गावात नालीजवळ आढळले २ ते ३ दिवसांचे नवजात बालक, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु https://www.navarashtra.com/maharashtra/a-2-to-3-day-old-baby-was-found-near-a-drain-in-jamb-village-of-bhandara-district-and-started-treatment-at-the-district-hospital-nraa-266079.html”]
दरम्यान सकाळी ९ वाजताच्या सुमारास कंटेनर क्रमांक एन एल ०१ क्यु ०९२१ हा करंजीकडून आदिलाबादकडे संशयित रित्या जातांना दिसला. सदर कंटनरला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.परंतु, चालकाने पोलिसांना पाहून त्याचा कंटेनर न थांबवता भरधाव वेगात अदिलाबादच्या दिशेने पळवून नेला. त्यानंतर पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, काही अंतरावर कंटेनर चालकाने कंटेनर सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर कंटेनरच्या केबीनची पाहणी केली असता कंटेनर मध्ये संबधीत दोन आरोपी आढळले. सदर कंटेनरची पंचासमक्ष पाहणी केली असता आतमध्ये लहान – मोठे म्हशीचे पारडे/रेडे असून ४९ जनावरे अतिशय निदर्यतेने चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबून असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष ४९ जनावरे अंदाजे ४ लाख ४९ हजार व कंटेनर १९ लाख असा एकूण २३ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर मिळालेल्या म्हशीचे पारडे / रेडे यांच्यासह कंटेनर अष्टभुजा गोरक्षण ट्रस्ट, चोरंबा रोड, येथे नेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक निलेश बापुराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पांढरकवाडा पोलिसांनी ट्रकचालकासह तिंघावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Three persons involved in illegal transportation of buffaloes were seized while goods worth rs 23 lakh 49 thousand were seized nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 03:53 PM

Topics:  

  • yavatmal news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.