Tikona Fort Conservation Campaign under the initiative of MP Nilesh Lanke Wadgaon Maval News
वडगाव मावळ : पावसाळ्यामध्ये अनेकजण गडकिल्ल्यांवर फिरण्यासाठी जातात. मात्र गडकिल्ले हे केवळ फिरण्याचे ठिकाण नाही तर आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे हे गडकिल्ले संवर्धन करणे आणि जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. मावळ तालुक्यातील तिकोना गडावर गडकिल्ले संवर्धन मोहिमे राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या संकल्पनातून स्वच्छता व वृक्षारोपण पाचवी मोहीम पार पडली. यावेळी हजारो शिवभक्तांनी गडाची काळजी घेत यामध्ये सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोहिमेत सहभागी झाले होते
खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर श्रमदान वृक्षारोपण असे विविध गड किल्ले संवादाच्या दृष्टीने उपक्रम राबवले जातात. गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमेत मावळ तालुक्यातील तिकोना किल्ला हा पाचवा गडकिल्ला ठरला असून या किल्ल्यावर या मोहिमेअंतर्गत भर पावसात मल्लखांब प्रात्यक्षिक, झाडांचे संवर्धन करणे. ठिकठिकाणी डस्टबिन लावणे, वीज, फलक दुरुस्ती ही कामे करण्यात आली. यावेळी 55 विद्यार्थ्यांनी प्रारंभी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या गडकिल्ले संवर्धन मोहिमेचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे युवक अध्यक्ष विशाल वहिले, आफताब सय्यद, जिल्हाध्यक्ष अतुलजी राऊत, सोमनाथ धोंगडे भूषण आसवले किसन कदम पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर विजय शिंदे अरुण वाघमारे अभिजीत सोनवणे स्थानिक ग्रामस्थ आदी जणांनी केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी राष्ट्रवादी पुणे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सामील झाले होते. यावेळी त्यांनी देखील श्रमदान करत गडकिल्ल्यांचे संवर्धन केले. यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, “तिकोना गडावर येणे हे आमचे भाग्य आहे गडकिल्ले वाचवण्यासाठी शासनाची मदत मिळाली नाही तरी खासदार निलेश लंके लोकसह गातून गड संवर्धन करत आहोत या गडाच्या संवर्धनासाठी दहा कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिदे यांनी व्यक्त केले आहे.
या मोहिमेत कोणतेही पक्ष व पदाला महत्व नाही
या गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमेबाबत खासदार निलेश लंके यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार निलेश लंके म्हणाले की, सर्व जाती धर्माचे तरुण या मोहिमेत सहभागी होत आहे मुस्लिम समाजाचे शंभरहून अधिक मावळे या मोहिमत सहभागी झाले आहेत गड आपले प्रेरणास्थान आहे या मोहिमेद्वारे शिवकालीन वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
–