Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadanvis News: महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी षडयंत्र…; फडणवीसांचा गौप्यस्फोट

या सभेला महाराष्ट्रातील किमान चार ते पाच जण उपस्थित होते,त्यात एका प्रमुख विचारवंताचाही समावेश होता.हा विचारवंत भारत जोडो मोहिमेशी संबंधित होता. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत त्यांचा सक्रिय भा

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 21, 2024 | 03:53 PM
Devendra Fadanvis News:  महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी षडयंत्र…; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. महायुतीने 230 जागा मिळवल्या तर महाविकास आघाडीने 49 जागा मिळवल्या. राज्यभरात ईव्हीएम विरोधात विरोधकांसह अनेकांनी आवाज उठवला आहे. बॅलटपेपवर मतदान घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नेतेच नव्हे तर राजकीय पत्रकार, विश्लेषक ईव्हीएम विरोधात आवाज उठवू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणूक आणि ईव्हीएमबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काठमांडू येथे शहरी नक्षलवाद आणि ईव्हीएमबाबत सभागृहाला माहिती देताना झालेल्या बैठकीचा उल्लेख केला होता.निवडणुकीपूर्वी 12 ते 14 नोव्हेंबर 2023 दरम्यान काठमांडूच्या कांतीपूर भागात माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक विशेषत: माओवाद्यांच्या टॉप कमांडरची होती. या बैठकीत भारत, नेपाळ, बांगलादेश आणि मणिपूर येथील माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सहभागी झाले होते. या बैठकीत महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली.

Weather Forecast: काश्मीर – लडाख थंडीचे थर्ड डिग्री टॉर्चर, -22 डिग्रीवर पारा उतरला

महाराष्ट्रातून चार ते पाच जणांचा समावेश

या सभेला महाराष्ट्रातील किमान चार ते पाच जण उपस्थित होते,त्यात एका प्रमुख विचारवंताचाही समावेश होता.हा विचारवंत भारत जोडो मोहिमेशी संबंधित होता. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत त्यांचा सक्रिय भाग होता.महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यानही या व्यक्तीने संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करून सरकारविरोधी घोषणाही दिल्या होत्या.

माओवाद्यांनी धक्कादायक पावले उचलण्याच्या सूचना

काठमांडू बैठकीनंतर माओवाद्यांना पुढील पावले उचलण्याच्या नव्या सूचना देण्यात आल्या.विशेषतः महाराष्ट्रात आणि देशभरात ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची योजना आखण्यात आली होती. या आंदोलनाची चार टप्प्यात विभागणी करून अंमलबजावणी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

पहिला टप्पा – मीडिया आणि समाज माध्यमातून ईव्हीएमवर संशय निर्माण करून आरोप केले जातील जेणेकरून लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होईल.

दुसरा टप्पा – महाराष्ट्राबरोबरच इतर राज्येही ईव्हीएमविरोधात आवाज उठवतील आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करतील.

 

जर्मनीत ऐन ख्रिसमस दरम्यान मोठी दुर्घटना; एका व्यक्तीने डझनभर लोकांना चिरडले, 

तिसरा टप्पा – महाराष्ट्रात महाआघाडी सरकारवर नाराज असलेल्या समाजातील विविध घटकांना, विशेषत: मुस्लीम, दलित आणि ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरवून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण केले जाईल.

चौथा टप्पा – शेवटी, आंदोलनाला हिंसक बनवण्याची योजना आहे ज्यामध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावरील लढाई सुरू केली जाईल आणि अराजकतेचा आरोप केला जाईल.

माओवाद्यांनी रचला होता मोठा कट

काठमांडूमध्ये झालेल्या या बैठकीनंतर माओवाद्यांच्या प्रमुख कमांडर्सनी त्यांच्या कार्यकर्त्यांना या धोरणात्मक सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. यावरून आगामी काळात महाराष्ट्र आणि देशातील राजकीय वातावरण प्रभावित करण्याचा मोठा कट माओवाद्यांकडून रचला जात असल्याचे स्पष्ट होते.

 

Web Title: To spoil the atmosphere in maharashtra fadnaviss revelation nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 01:56 PM

Topics:  

  • assembly election 2024
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
4

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.