Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! महाबळेश्वर पर्यटन महोत्सव 2025 साठी टोलमाफी जाहीर मात्र एका अटीवर

जर तुम्ही सहकुटुंब यंदाच्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे या महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांसाठी टोलमाफी करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2025 | 04:27 PM
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! महाबळेश्वर पर्यटन महोत्सव 2025 साठी टोलमाफी जाहीर मात्र एका अटीवर

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! महाबळेश्वर पर्यटन महोत्सव 2025 साठी टोलमाफी जाहीर मात्र एका अटीवर

Follow Us
Close
Follow Us:

सातारा/ दत्तात्रय पवार: पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाबळेश्वर नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतं. या निसर्गाच्या विविध रंगांनी नटलेलं हे पर्यटनस्थळ वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. आता या रम्य स्थळाला भेट देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाबळेश्वर पर्यटन महोत्सव 2025 दरम्यान येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफी मिळणार आहे ! मात्र, त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. काय आहे ती अट? चला जाणून घेऊया.

2 ते 4 मे – “नो टोल झोन” महाबळेश्वर !

वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी मोठा निर्णय घेत महोत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी 2 ते 4 मे या तीन दिवसांच्या कालावधीत टोलमाफी जाहीर केली आहे. हे तीन दिवस महाबळेश्वरमध्ये एक नवा उत्सव, एक नवा अनुभव देणार आहेत.

Raigad Fort : रायगड किल्ल्याचं वास्तू वैभव परतणार; पुरातत्व आणि स्थापत्य शास्त्राच्या आधारे अभ्यासपूर्ण चित्रांची निर्मिती

महोत्सवाची ओपनिंग भारीच !

या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचं उद्घाटन एक शानदार सोहळा ठरणार असून, त्यानंतर महाबळेश्वरमध्ये संस्कृती, चव आणि साहस यांचा अविस्मरणीय संगम पाहायला मिळणार आहे.

संस्कृतीचा थाट आणि साहसाचा धमाका

3 मे रोजी “साबणे रस्ता” येथे भव्य संस्कृतिक मिरवणूक आणि खाद्यसंस्कृतीचा अनोखा जलवा पाहायला मिळेल.

4 मे ला पारंपरिक लोककला, नृत्य, आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाचा समारोप होईल. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर उभारले जाणारे १०० हून अधिक तंबू, वेण्णा तलावात नौकाविहार, साहसी जलक्रीडा, अशा साऱ्या गोष्टी पर्यटकांचा अनुभव अविस्मरणीय करणार आहेत.

मात्र, टोलमाफीसाठी ‘ही’ आहे एक अट

टोलमाफी फक्त पर्यटन महोत्सवासाठी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, स्थानिक वाहतूक किंवा इतर कामांसाठी होणारी ये-जा या सवलतीत धरली जाणार नाही. म्हणजेच – फक्त महोत्सवासाठी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफीचा लाभ घेता येणार आहे !

मंगळवेढा तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड, 18 जणांवर गुन्हा दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पर्यटकांमध्ये उसळला उत्साह

मुंबई, पुणे, सातारा आणि इतर भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक या महोत्सवासाठी महाबळेश्वरच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज आहेत. टोलमाफीचा लाभ घेत एक नवा अनुभव घेण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

महाबळेश्वर आता पर्यटनाचा ब्रँड होण्याच्या वाटेवर?

या भव्य महोत्सवाच्या माध्यमातून महाबळेश्वर केवळ थंड हवामानाचं ठिकाण न राहता, राज्याच्या पर्यटन नकाशावर एक ‘आयकॉनिक डेस्टिनेशन’ म्हणून उभं राहतंय. प्रशासन, स्थानिक यंत्रणा आणि राज्य सरकार यांचा समन्वयातून हा महोत्सव पर्यटनाला नवी दिशा देणार, हे निश्चित !

Web Title: Toll waiver announced for the tourist coming for mahabaleshwar tourism festival 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.