सोलापूर: सोलापूरच्या बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. भाग्यश्री म्हेत्रे (वय १६) आणि जिया म्हेत्रे (वय १६) अशी मृत मुलींची आहेत. जयश्री महादेव म्हेत्रे (वय १८) हीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणावरुन सोलापूरकर आक्रमक झाले असून पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्याचा पीडित कुटुंबांचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोलापूरला सतत पाणी दूषित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे आता सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोलापूरमध्ये होणाऱ्या दुषित पाणी पुरवठ्यामुळे मुली आजारी पडल्याचा आरोप हाेत अाहे.
कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे या मुलींचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे.
इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका
पिंपरी चिंचवड महानगर पालिका, तसेच उगमस्थानापासून विविध ठिकाणी नदीपात्रात मिसळत जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला आता हिमनगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळपासून इंद्रायणीच्या पात्रात पांढराशुभ्र फेसाचे मोठ्या आकारातील थर तरंगत असल्याने भाविकांचे, तसेच जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाची पातळी मोठी असल्याने इंद्रायणीच्या पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चिखली, कुदळवाडीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर इंद्रायणीतील प्रदूषण कमी होईल, असा दावा तेथील राजकीय मंडळी करत होती. मात्र, हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. कारण, अद्यापपर्यंत इंद्रायणीच्या प्रदूषणाची पातळी अजिबात कमी झाली नाही. याउलट महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दिवसेंदिवस इंद्रायणीतील पाण्याला उग्र वास, कधी हिरवट तर कधी काळपट रंग होत आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या उगमस्थानापासून विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. एवढेच काय केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषदेचे सांडपाणीही इंद्रायणीत सोडले जात आहे.
इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप
सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नदी बारमाही वाहत असल्याचे चित्र आहे. सध्या आळंदीतील इंद्रायणीत कोठेही जा सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी काळपट रंगाचे पाणी वाहताना दिसते. याचबरोबर जलपर्णीही मोठ्या प्रमाणात आहे.