Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-बंगळूर महामार्गावरील कोंडी फुटणार; देहूरोड ते सुतारवाडीदरम्यान 15 किमीचा ‘सिक्स लेन’ एलिव्हेटेड कॉरिडॉर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गाचे भूसंपादन, सेवा रस्त्यांचे (सर्व्हिस रोड) रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2026 | 04:20 PM
मुंबई-बंगळूर महामार्गावरील कोंडी फुटणार; देहूरोड ते सुतारवाडीदरम्यान 15 किमीचा 'सिक्स लेन' एलिव्हेटेड कॉरिडॉर

मुंबई-बंगळूर महामार्गावरील कोंडी फुटणार; देहूरोड ते सुतारवाडीदरम्यान 15 किमीचा 'सिक्स लेन' एलिव्हेटेड कॉरिडॉर

Follow Us
Follow Us:

पिंपरी : मुंबई-बंगळूर महामार्गावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीत होणारी भीषण वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवले पुलाला जोडणारा देहूरोड ते सुतारवाडी असा सुमारे १५.८७ किलोमीटर लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रस्तावित करण्यात आला. यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी पुण्यातील नवले पुलाच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी देहूरोड ते सुतारवाडी या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाबाबत सभागृहात विचारणा केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.

नाशिक फाटा-खेडच्या धर्तीवर विकास

नाशिक फाटा ते खेड दरम्यान ज्याप्रमाणे आठ पदरी एलिव्हेटेड मार्ग साकारला जात आहे, त्याच धर्तीवर देहूरोड-सुतारवाडी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गाचे भूसंपादन, सेवा रस्त्यांचे (सर्व्हिस रोड) रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. आगामी काळात महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी हा रस्ता मैलाचा दगड ठरणार आहे.

आयटी हब आणि उपनगरांसाठी ‘वरदान’

हिंजवडी आयटी पार्क आणि लगतच्या गावांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरमुळे खालील भागांना थेट लाभ मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड : वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत आणि किवळे. पुणे शहर : बालेवाडी, बाणेर, सुस आणि बावधन. ग्रामीण परिसर : माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई.

प्रवास वेगवान करणार नाही तर…

“देहूरोड ते सुतारवाडी हा १५.८७ किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर केवळ प्रवास वेगवान करणार नाही, तर शहराच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देईल. भूसंपादन आणि सेवा रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून या कामाला गती देण्याची आमची आग्रही मागणी आहे. या प्रकल्पासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”

– शंकर जगताप, आमदार

हेदेखील वाचा : Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य

Web Title: Traffic congestion on mumbai bengaluru highway set to ease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Pimpri News
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
1

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार
2

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.