Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता नियमानेच ! वाहतूक पोलिसांना स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढून आकारता येणार नाही दंड

वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो, चित्रीकरण करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे स्वत:च्या फोनवरून वाहतूक पोलिस कर्मचारी, अंमलदार यांना दंडात्मक कारवाई करता येत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 09:23 AM
वाहतूक पोलिसांना स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढून दंड आकारता येणार नाही

वाहतूक पोलिसांना स्वतःच्या मोबाईलवरून फोटो काढून दंड आकारता येणार नाही

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वाहन चालवताना नियमांचं उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा हे वाहतूक पोलिस ई-चालान करताना अधिकृत मशिन न वापरता खाजगी मोबाईलवरून दंड आकारत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अनेक तक्रारीही आल्या आहेत. त्यामुळेच आता अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळूंके यांनी यासंबंधी पत्र जारी करत शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्यातील वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार वाहने थांबवून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो, चित्रीकरण करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अशाप्रकारे स्वत:च्या फोनवरून वाहतूक पोलिस कर्मचारी, अंमलदार यांना दंडात्मक कारवाई करता येत नाही. असे असतानाही हे कर्मचारी वाहनचालकांवर कारवाई करून दंड आकारत असल्याचे पुढे आले आहे. असे न करण्याबाबत यापूर्वीच संबंधित विभागाला आदेशित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही पोलिस अधिकारी, अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो, चित्रीकरण करून दंड आकारत आहेत.

दरम्यान, या संदर्भात मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना तशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. तक्रारी संदर्भाने तत्कालीन परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाहनचालक, मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या वैयक्तिक मोबाईलमधून फोटो, चित्रीकरण करण्याच्या प्रकाराबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर आता संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

गोपनीयतेचे होतंय उल्लंघन

खाजगी मोबाईलवरून फोटो काढल्याने वाहनधारक, मालकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होते, त्यात गैरवापर होण्याची शक्यता निर्माण होते, असे बैठकीत निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर, उपमहानिरीक्षक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार, यापुढे सर्व दंडात्मक कारवाई अधिकृत कॅमेर्‍यांद्वारे, सिस्टमवर रेकॉर्ड ठेवून आणि रियल टाईम डेटाच्या आधारे केली जावी, असे आदेश देण्यात आले.

…तर पोलिसावरच शिस्तभंगाची कारवाई

जर एखाद्या पोलिसाने स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली, तर त्याच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे बजावण्यात आले. यासंबंधिचा आदेश 3 जुलै रोजी सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळूंके यांनी जारी करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Traffic police will not be able to fine people by taking photos from their own mobile phones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • Maharashtra Police
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪
1

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ 17 रस्ते बंद
2

Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ 17 रस्ते बंद

राज्यातील पोलीस शिपायांसाठी पीएसआय पदाची मर्यादित विभागीय परीक्षा! करा अर्ज
3

राज्यातील पोलीस शिपायांसाठी पीएसआय पदाची मर्यादित विभागीय परीक्षा! करा अर्ज

ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरती सुरु! महत्वाची अपडेट आली समोर; नक्की वाचा
4

ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरती सुरु! महत्वाची अपडेट आली समोर; नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.