Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khed Panchayat Samiti Election: गट–गणांत तिरंगी–चौरंगी लढती, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

भाजपने ७ गट आणि १३ गणांमध्ये उमेदवार देत निवडक ठिकाणी ताकद केंद्रित करण्याची रणनीती अवलंबल्याचे दिसते. शिंदे गटाच्या शिवसेनेने ५ गट आणि १४ गणांमध्ये उमेदवार देत ग्रामीण भागात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 24, 2026 | 09:30 PM
Khed Panchayat Samiti Election, Local Body Elections, Zilla Parishad,

Khed Panchayat Samiti Election, Local Body Elections, Zilla Parishad,

Follow Us
Close
Follow Us:
  • पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण
  • भाजपची ७ गट आणि १३ गणांमध्ये उमेदवार देत निवडक ठिकाणी ताकद केंद्रित करण्याची रणनीती.
  • पक्षापेक्षा स्थानिक नेते, कुटुंबीय राजकारण आणि सामाजिक समीकरणे अधिक प्रभावी
प्रभाकर जाधव, Rajgurunagar : खेड तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पंचायत समितीच्या ८ जिल्हा परिषद गटांसाठी ७७, तर १६ गणांसाठी तब्बल १६३ अर्ज दाखल झाल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती अटळ ठरणार आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व गट व गणांत उमेदवार दिले आहेत. यावरून दोन्ही पक्ष तालुक्यातील नेतृत्व पुन्हा मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते.

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कच्या संचलनात घुमणार कोकणचा आवाज, पर्यटन विभागाचा ‘कोकण पर्यटन’

दुसरीकडे भाजपने ७ गट आणि १३ गणांमध्ये उमेदवार देत निवडक ठिकाणी ताकद केंद्रित करण्याची रणनीती अवलंबल्याचे दिसते. शिंदे गटाच्या शिवसेनेने ५ गट आणि १४ गणांमध्ये उमेदवार देत ग्रामीण भागात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल न होणे. यामुळे तालुक्यातील त्यांच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांपूर्वी ही मोठी राजकीय माघार मानली जात आहे. या परिस्थितीचा फायदा इतर पक्ष, विशेषतः अजित पवार गट घेण्याची दाट शक्यता आहे.

बहुतांश गटांमध्ये तीन ते चार उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः वाफगाव–रेटवडी, नाणेकरवाडी–म्हाळुंगे आणि पाईट–आंबेठाण या गटांत चौरंगी लढती होणार असून, येथे व्यक्तिगत प्रभाव, स्थानिक विकासकामे आणि गटबाजी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक नेते, कुटुंबीय राजकारण आणि सामाजिक समीकरणे अधिक प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. काही गटांत एकाच कुटुंबातील किंवा परिचित आडनावांचे उमेदवार समोरासमोर असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

येणाऱ्या प्रचारकाळात विकासकामांचा आढावा, पक्षांतर्गत फुटींचा मुद्दा, आणि राज्यपातळीवरील सत्तासंघर्षाचे पडसाद हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. विशेषतः शिवसेनेतील दोन गट आणि राष्ट्रवादीतील दोन गटांमधील अंतर्गत संघर्षाचा थेट परिणाम खेड तालुक्यातील निकालावर होण्याची शक्यता आहे.

अर्जांची संख्या, प्रमुख पक्षांची सक्रियता आणि नव्या–जुन्या चेहऱ्यांचा संघर्ष पाहता खेड पंचायत समिती निवडणूक तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. या निवड णुकीत कोणाचा वरचष्मा राहतो, यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची गणिते ठरतील, यात शंका नाही.

 

Web Title: Triangular and quadrangular contests in the constituencies with the possibility of political equations changing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले
1

Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
2

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल
3

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar News: शिंदेसेनेशी युतीवरून रणकंदन; छत्रपती संभाजीनगर भाजपात बंडखोरीचे संकेत
4

Chhatrapati Sambhaji Nagar News: शिंदेसेनेशी युतीवरून रणकंदन; छत्रपती संभाजीनगर भाजपात बंडखोरीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.