Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटात ट्रक पलटी ; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी

उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटातून चाकण या ठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघालेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २६) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 27, 2023 | 04:10 PM
उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटात ट्रक पलटी ; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी
Follow Us
Close
Follow Us:

उरुळी कांचन  : उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटातून चाकण या ठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघालेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २६) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Truck overturned in Shindwane Ghat near Uruli Kanchan)

रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय- २१, रा. शेलू, ता. परतूर, जि. परभणी) असे मृत्यू पावलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पायल शेख, (वय- २३, रा. मिरज, सांगली) असे अपघातात जखमी झालेल्या त्याच्या मैत्रिणीचे नाव आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक रामेश्वर शिंदे हे फलटणवरून चाकणला कोंबडी खाद्य घेऊन निघाले होते. या ट्रकमध्ये त्याची मैत्रीण पायल ही देखील त्याच्या सोबत होती. रविवारी संध्याकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाटात आले असता शिंदे यांना घाटात असलेल्या वळणाचा अंदाज आला नाही व त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक हा रस्त्यावर पलटी झाला होता.

सदर घटनेची माहिती मिळताच ,कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश गायकवाड, बाळासाहेब पांढरे, आदींनी जखमींना मदत केली.

दरम्यान, ट्रकचालक शिंदे व पायल यांना उरुळी कांचन येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच शिंदे यांची मैत्रीण पायल शेख हिच्यावर उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु झाले असून पुढील उपचारासाठी मिरज या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शिंदवणे घाटात सातत्याने अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिक बोलत असून लागले आहेत. सदर ठिकाणी जड वाहने वळताना वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने हे अपघात होत आहेत. त्यामुळे सासवड – जेजुरी कडून येताना वळणाचा टप्पा लक्षात येत नसल्याने हे अपघात होत आहेत. हा वळणी टप्पा काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Truck overturned in shindwane ghat near uruli kanchan driver died on the spot one injured nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2023 | 04:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • Pune Accident News
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता
1

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम
2

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी
3

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी

Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?
4

Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.