विठुरायाच्या आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून पालखी सोहळे निघण्याची तयारी सुरू असताना, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नवनाथ खिलारे/सोलापूर: अवघ्या काही दिवसांवर आषाढी सोहळा येऊन ठेपला असताना सोलापूर जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान आपल्याला अत्यंत दक्षता बाळगावी लागणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी केले आहे.
विठुरायाच्या आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून पालखी सोहळे निघण्याची तयारी सुरू असताना, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. माळशिरस तालुक्यातील राऊतनगर-अकलूज आणि माळीनगर येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली असून, नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे
आरोग्य विभाग सतर्क, उपाययोजनांना सुरुवात
सद्यस्थितीमध्ये आषाढीसाठी येणाऱ्या पालखी सोहळ्याबाबत कोरोनाच्या उपाययोजना म्हणून जिल्हा आरोग्य विभागाने २५ हजार रॅट किट, १० हजार आरटीपीसीआर ट्यूब, १० हजार एन २५ मास्क, ५० हजार सर्जिकल मास्क, ५०० पीपीई किट, १०० एमएलच्या १००० सॅनिटायझर बाटल्या आणि १० हजार हँड ग्लोजची मागणी केली आहे. येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला अतिदक्षता बाळगावी लागणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विषयक काळजी घ्यावी आणि लक्षणे आढळताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बोधले यांनी पुन्हा केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
” आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः ज्यांना इतर आरोग्य समस्या आहेत, त्यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या, बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह घरीच बरे होत आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.”
सदर रुग्णांनी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे खाजगी ‘एपेक्स हॉस्पिटल’ आणि ‘हीदम हॉस्पिटल’ येथे उपचारासाठी दाखल झाले असता, खाजगी लॅबमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. याची खबर माळशिरस तालुका आरोग्य विभागाला मिळताच, त्यांनी सदर दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची तात्काळ तपासणी केली केली आहे. यातील एका रुग्णाने प्रवास केल्याचेही समोर आले आहे. या दोन्ही रुग्णांची माहिती सोलापूर जिल्हा चिकित्सकांना दिल्याचे डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.
– डॉ. एकनाथ बोधले, (पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी)
Web Title: Two patients in solapur district ashadhi wari 2025 helath department maharashtra government