Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News : करवडीत विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू; पोहण्यासाठी विहिरीत उतरले अन्…

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाईट गेल्यामुळे आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2025 | 01:12 PM
दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्...

दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

कराड : करवडी (ता.कराड) येथे विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडीत शोककळा पसरली आहे. राजवर्धन किशोर पाटील (वय 22) आणि राजेंद्र दादा कोळेकर-मोरे (वय 55) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्रि साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेतजमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर यांना पोहण्याची इच्छा झाली. याबाबत राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली. यावेळी ‘दुपारची वेळ आहे, विहिरीत उतरू नका’, असे वडिलांनी सांगितले. फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले.

दरम्यान, 15-20 मिनिटांनी किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र, अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. विहिरीच्या शेजारी दोघांची कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाईट गेल्यामुळे आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही. शेवटी कराडमधील मासेमारी करणाऱ्या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर यांचे मृतदेह बाहेर काढले.

कराड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल

याबाबतची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. शवविछेदन झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Two peoples die after drowning in well in karwadi satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Drowning in Lake
  • Satara News

संबंधित बातम्या

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
1

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा
2

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
3

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती
4

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.