Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुर्दैवी ! मोहोळमध्ये ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने दोन्ही बहिणींचा मृत्यू

राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर सोबत ऊस तोडणीचे काम करतात. त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 09, 2024 | 01:22 PM
Accident

Accident

Follow Us
Follow Us:

सोलापूर : चार वर्षांच्या लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण ऊसाच्या फडात सुरू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गिअरवर पडला. यावेळी ट्रॅक्टर तसाच पुढे गेल्याने दोघी बहिणी खाली पडल्या. यावेळी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेला. त्यामुळे या बहिणी गंभीररित्या जखमी झाल्या. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत घडली.

हेदेखील वाचा : आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल सव्वा कोटींचा घातला गंडा

ऊस तोडीच्या फडात शनिवारी (दि.7) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. निता राजू राठोड व अतिश्री राजू राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानुबाई राजु राठोड (रा. पाटागुडा ता. जिवती जि. चंद्रपूर) या पती राजू राठोड मुली ज्योती, निता, अतिश्री, भाग्यश्री, गिता व एक मुलगा अभिनंदन असे एकत्रित राहतात. ते ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर सोबत ऊस तोडणीचे काम करतात. त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या. चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या.

दरम्यान, याप्रकरणी मुलींची आई शानुबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास अपघात विभागाचे पोलीस करत आहेत.

ऊस तोडणीचे काम होते सुरू

७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६: १५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शानूबाई राठोड व त्यांचे पती राजु राठोड आष्टे (ता. मोहोळ) येथे कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करीत होते. ऊसाच्या बांधवर असलेला टॅक्टर हा चालक सुनिल गुलाब राठोड (रा. डिगरस ता. कंदार जि. नांदेड) याने तसाच चालू ठेवला होता. दरम्यान, त्या ट्रॅक्टरमध्ये निता राजु राठोड (वय २०), ही लहान बहिण अतिश्री (वय ४) हिला कंबरेवर घेऊन चढताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गिअरवर तिचा पाय पडला.

हेदेखील वाचा : Delhi Crime: मॉर्निंग वॉक करून घरी परत असताना व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Two sisters die after being run over by tractor wheel in mohol nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 01:22 PM

Topics:  

  • accident in solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
2

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.