Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: सोलापूर महापालिकेचा विकासाचा मेगाप्लॅन! पाणीटंचाईपासून भटक्या कुत्र्यांपर्यंत; २७ विषयांवर होणार खल

Solapur Municipal Corporation General Body Meeting: सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, नाट्यगृह उभारणी आणि सफाई कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था अशा २७ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 13, 2026 | 08:53 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सोलापूर महापालिकेचा मेगाअजेंडा तयार
  • महापालिकेच्या सभेत २७ विषयांचा धडाका
  • नाट्यगृह ते भटक्या कुत्र्यांसाठी ७.२० कोटींचा प्रस्ताव
सोलापूर शहर: सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर तब्बल २७ विषयांचा समावेश करण्यात आला असून, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, नाट्यगृह उभारणी, सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न, शाळांचा विकास आणि नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर सभेत चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे या सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (Solapur)

Karjat News : टोरंट प्रकल्पाला परवानग्या मिळत असताना खासदार काय करीत होते? ॲड. ऋषिकेश जोशी यांचा सवाल

या सभेतील सर्वाधिक लक्षवेधी प्रस्ताव म्हणजे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी १५ टँकर खरेदी करण्याचा आहे. यासाठी २ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये ५ हजार लिटर क्षमतेचे १० टँकर आणि १० हजार लिटर क्षमतेचे ५ टँकर खरेदी करण्यात येणार आहेत. शहरातील पाणीपुरवठ्याची गरज आणि आपत्कालीन परिस्थितीत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रश्न लक्षात घेता त्यांच्या निर्बीजीकरणासाठी ७ कोटी २० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या प्रस्तावाला विशेष महत्त्व आहे.

शहराच्या पाणीपुरवठा योजनेलाही या सभेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणी आणि जलवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या खासगी जागेचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि शहराची पाण्याची गरज लक्षात घेता या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे.

सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठीही महत्त्वाचा निर्णय या सभेत अपेक्षित आहे. सुंदरम नगर येथे नाट्यगृह उभारण्यासाठी २२ कोटी ४६ लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या कामाला मान्यता देण्याचा विषय अजेंड्यावर आहे. या नाट्यगृहामुळे शहरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि नाट्य चळवळीला नवे व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

बुधवार पेठेतील जीर्ण झालेल्या सफाई कर्मचारी वसाहतीचा प्रश्नही सभेत चर्चेला येणार आहे. जुन्या वसाहतीच्या जागेवर नवीन इमारती उभारून पात्र सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार आहे.

महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत विविध योजनांना निधी

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एमएस-सीआयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी १ कोटी ३९ लाख ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा यामागील उद्देश आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत महापालिकेच्या सात मराठी शाळांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी अडीच कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. शाळांमधील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरण सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांसाठी ८९ लाख ९८ हजार ७४१ रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यामध्ये धोत्रीकर वस्ती येथे समाजमंदिर उभारणे, थोबडे वस्ती येथे रस्ता विकसित करणे आणि तुळजापूर नाका येथील हनुमान मूर्ती परिसरात सुधारणा करण्याच्या कामांचा समावेश आहे.

सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ६५ लाख ६३ हजार ४०४ रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत. सहारा नगर, काजल नगर परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था तसेच विविध प्रभागांमध्ये नवीन इलेक्ट्रिक पोल आणि एलईडी फिटिंगची कामे केली जाणार आहेत.

रस्ते, उद्याने आणि नागरी सुविधांवरही चर्चा

याशिवाय विविध प्रभागांतील रस्ते विकास, एलईडी पथदिवे, समाजमंदिर, उद्यान परिसरातील सुधारणा, अल्पसंख्याक व मागासवर्गीय कल्याणकारी योजनांमधील कामे आणि महापालिकेच्या मिनी शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या भाडेकरारासंबंधीचे विषयही सभेत मांडण्यात येणार आहेत.

एकूणच २७ विषयांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारे प्रस्ताव सभेसमोर येणार आहेत. या प्रस्तावांना सभेत कितपत मंजुरी मिळते आणि प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सभेतील पाच महत्त्वाचे आर्थिक प्रस्ताव

  • महिलांसाठी एमएस-सीआयटी व एआय प्रशिक्षण १ कोटी ३९ लाख ६५ हजार
  • १५ पाणी टँकर खरेदी २ कोटी ३३ लाख ५० हजार
  • सात मराठी शाळांचा विकास २.५० कोटींहून अधिक
  • मागासवर्गीय वस्त्यांतील विकासकामे ८९ लाख ९८ हजार ७४१
  • नगरोत्थान अभियानातील कामे ६५ लाख ६३ हजार ४०४
Nandurbar News : ‘काळजी करू नका,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’; मंत्री आदिती तटकरे यांची बालिकाश्रमातील मुलींना ग्वाही
💡

Frequently Asked Questions

  • Que: सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार ?

    Ans: सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

  • Que: महापालिकेच्या सभेच्या अजेंड्यावर किती विषय आहेत?

    Ans: या सभेच्या विषयपत्रिकेवर शहराच्या विकासाशी संबंधित एकूण २७ महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.

  • Que: भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी किती निधी प्रस्तावित आहे?

    Ans: भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेने ७ कोटी २० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Web Title: Solapur municipal corporation 27 agenda development projects water supply stray dogs pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. माधव कुलकर्णी पुन्हा विराजमान; डॉ. दुर्गा जोशींकडे मोठी जबाबदारी
1

Solapur News : समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. माधव कुलकर्णी पुन्हा विराजमान; डॉ. दुर्गा जोशींकडे मोठी जबाबदारी

Solapur News : दिवाळीच्या रॉकेटने घडवला अनर्थ! सात रस्ता बस डेपोत आगीचा भडका, तीन बसेस जळून खाक
2

Solapur News : दिवाळीच्या रॉकेटने घडवला अनर्थ! सात रस्ता बस डेपोत आगीचा भडका, तीन बसेस जळून खाक

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग
3

ऊसदरासाठी राजू शेट्टी पुन्हा करणार आंदोलन; पंढरपुरातून आंदोलनाचे फुंकणार रणशिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.