
Solapur city bus depot fire
सोलापूर, शहर प्रतिनिधी : दिवाळीच्या फटाक्यांमधून उडालेल्या रॉकेटच्या ठिणगीमुळे सात रस्ता येथील सिटी बस डेपोमध्ये बुधवारी (दि. ११) रात्री भीषण आग लागली. डेपो परिसरात भंगार अवस्थेत उभ्या असलेल्या तीन कालबाह्य सिटी बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने डेपोतील अन्य बसेस आणि मुख्य इमारतीलाही धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अवघ्या २० ते २५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Solapur News)
सात रस्ता येथील सिटी बस डेपोमध्ये कालबाह्य झालेल्या आणि भंगारात काढण्यासाठी ठेवलेल्या बसेस एका ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असून, ते वाळलेल्या अवस्थेत होते. दिवाळीनिमित्त परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमधील रॉकेटची ठिणगी या वाळलेल्या गवतावर पडल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला गवताने पेट घेतला. त्यानंतर आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत उभ्या असलेल्या बसेसपर्यंत पोहोचल्या. बसमधील सीट कव्हरने पेट घेतल्यानंतर काही मिनिटांतच आगीने भीषण स्वरूप धारण केले. पाहता पाहता तीन बसेस आगीच्या विळख्यात सापडल्या. रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. डेपोतील अन्य बसेसपर्यंत आग पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप लक्षात घेऊन चार अग्निशमन बंबांच्या साहाय्याने पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. जवानांनी आग अन्य बसेसपर्यंत पसरू नये, यासाठी प्रयत्न केले. सुमारे २० ते २५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. वेळीच आग आटोक्यात आल्याने डेपोतील मुख्य इमारत आणि जवळ उभ्या असलेल्या अन्य बसेस सुरक्षित राहिल्या. आग आणखी पसरली असती तर मोठ्या नुकसानीची शक्यता होती. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.
या आगीत जळालेल्या तिन्ही बसेस कालबाह्य झालेल्या होत्या. त्या भंगारात काढण्यासाठी डेपोमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या बसेसमधील इंजिन, डिझेल आणि इतर महत्त्वाचे साहित्य यापूर्वीच काढून घेण्यात आले होते. त्यामुळे आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याची माहिती परिवहन नियंत्रण अधिकारी सारिका कुलवार यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी रात्री डेपोला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या घटनेमुळे सिटी बस डेपोमधील स्वच्छता आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. भंगारातील बसेस उभ्या असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळलेले गवत असल्याने आग वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. डेपो परिसरातील गवत वेळोवेळी काढून स्वच्छता राखली असती, तर आगीचा धोका कमी करता आला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक डेपो, वाहनतळ आणि भंगार साहित्य साठविलेल्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
सात रस्ता सिटी बस डेपोमध्ये भंगारातील बसेस उभ्या असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळलेले गवत होते. फटाक्याच्या रॉकेटमधील ठिणगी या गवतावर पडल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. गवतापासून बसच्या सीट कव्हरपर्यंत पोहोचलेल्या आगीने काही मिनिटांतच तीन बसेसना वेढले. त्यामुळे डेपो परिसरातील नियमित स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा सुरू केला. आग अन्य बसेस आणि मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. आगीत जळालेल्या तिन्ही बसेस भंगार अवस्थेतील होत्या. त्यांचे इंजिन, डिझेल आणि महत्त्वाचे साहित्य आधीच काढून घेण्यात आले होते. त्यामुळे या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे परिवहन नियंत्रण अधिकारी सारिका कुलवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
Washim news: वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई! एकाच आरोपीकडून ५ चोरीच्या दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात
Ans: सोलापुरातील सात रस्ता परिसरातील सिटी बस डेपोमध्ये बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली.
Ans: या आगीत भंगार अवस्थेत उभ्या असलेल्या तीन कालबाह्य सिटी बसेस जळून खाक झाल्या.
Ans: महापालिकेच्या अग्निशमन दलाने चार अग्निशमन बंबांच्या मदतीने सुमारे २० ते २५ मिनिटांत आग आटोक्यात आणली.