Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औंरगाबादमधील दोन विद्यार्थ्यांचा काशीद समुद्रकिनारी बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

औरंगाबाद जिल्ह्यातील साने गुरुजी माध्यमिक शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूड (Murud) तालुक्यातील काशीद समुद्र किनारा (Kashid Beach) पाहण्यासाठी आली होती. यावेळी ८० विद्यार्थ्यांचा समूह काशीद समुद्र किनारी आला होता त्यावेळी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

  • By साधना
Updated On: Jan 09, 2023 | 07:13 PM
मुरुमाच्या खाणीत बुडून बालकाचा मृत्यू

मुरुमाच्या खाणीत बुडून बालकाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

मुरुड जंजिरा: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) कन्नड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा काशीद येथील समुद्रात बुडून मृत्यू  (Two Students Dead) झाला. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील साने गुरुजी माध्यमिक शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूड (Murud) तालुक्यातील काशीद समुद्र किनारा (Kashid Beach) पाहण्यासाठी आली होती. यावेळी ८० विद्यार्थ्यांचा समूह काशीद समुद्र किनारी आला होता त्यावेळी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. प्रणव कदम आणि रोहन बेडवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

[read_also content=”‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’, उर्फी जावेदने साधला निशाणा-चित्रा वाघ यांनी दिलं ‘हे’ उत्तर https://www.navarashtra.com/maharashtra/chitra-wagh-replied-to-urfi-javeds-tweet-nrsr-360473.html”]

शाळेचे पाच विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहता पोहता हे पाचही जण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.  मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी लोकांनी पाण्यात उड्या टाकल्या. पाचपैकी तिघांना किनारी सुखरूप आण्यात आले. मात्र उर्वरित दोघे जण खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एकाचा मृतदेह लगेच सापडला. तर दुसरा मुलगा सापडण्यात अडचण येत होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने काही तासानंतर त्याचा मृतदेह शोधून काढला.

प्रणव कदम आणि रोहन बेडवाल यांचे वय साधारण १५ वर्षापर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे मुरुड पोलिसांनी सांगितले. तर कृष्णा पाटील, तुषार वाघ व अन्य एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्यांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Two students of aurangabad drowned at kashid beach while the came for school trip nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2023 | 07:10 PM

Topics:  

  • aurangabad
  • Murud

संबंधित बातम्या

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन
1

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग
2

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Raigad News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मुरुडमध्ये पार्किंगसाठी जादा पैसे मोजावे लागणार
3

Raigad News: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मुरुडमध्ये पार्किंगसाठी जादा पैसे मोजावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.