पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धेला आणि एका महिलेला चारचाकी वाहनाने धडक (Accident in Pimpri) दिली. यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडकेने वृद्धेसह एका महिलांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) दापोडी येथे हा अपघात झाला.
राजू इश्वरलाल रांका (वय 69, रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने शुक्रवारी (दि.16) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 69 वर्षीय आई आणि 43 वर्षीय मावस बहीण हे दापोडी येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपीच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने फिर्यादी महिलेच्या आई व मावस बहिणीला धडक दिली. यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करत आहेत.