Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant: “… प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई”; मंत्री उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2025 | 02:35 AM
Uday Samant: "... प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई"; मंत्री उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?

Uday Samant: "... प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई"; मंत्री उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्नपडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल. बनावट प्रमाणपत्रास मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नाना पटोले, वरूण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ११ दिव्यांग उमेदवारांची नायर हॉस्पिटल येथे पुनर्पडताळणी करण्यात आली. यामध्ये २ उमेदवारांचे दिव्यांगत्व प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. नाशिक महानगरपालिकेत भरती करण्यात आलेल्या हिंदी आणि उर्दू माध्यमातील दोन शिक्षकांकडे मात्र वैध दिव्यांग युनिक आयडी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. उमेदवारांची प्रवर्गानुसार कागदपत्र पडताळणी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाते. प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्यास उमेदवारास तत्काळ अपात्र ठरवले जात असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

उदय सामंतांची ठाकरेंवर खोचक टीका

“स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांची साथ जर ठाकरे गटाने सोडली असती, आणि ‘सामना’च्या अग्रलेखातून तसे स्पष्टपणे मांडले असते, तर कदाचित कुणीतरी त्याचा विचार केला असता,” अशा शब्दांत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.  सामंत म्हणाले, “राहुल गांधी जगभर फिरून वाटेल त्या पद्धतीने सावरकरांवर टीका करतात. त्यांनी सावरकरांनी माफीनामा दिला आणि इंग्रजांसमोर शरणागती पत्करली, असा आरोप केला. अशा आरोपांना उत्तर देणे ‘सामना’ या मुखपत्रातून अपेक्षित होतं. पण तसे झाले नाही.”

Uday Samant News: …तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता; उदय सामंतांची ठाकरेंवर खोचक टीका

ते पुढे म्हणाले, “ज्या लोकांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बसणं स्वीकारलं, त्यांना सावरकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाचा वापर करून भावनिक राजकारण केलं जातं, पण त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणाऱ्यांची साथसुद्धा स्वीकारली जाते. ही दुहेरी भूमिका योग्य नाही.”

Web Title: Uday samant said take action against doctors about fake certificate to disabled people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Doctors News
  • Maharashtra Government
  • Uday Samant

संबंधित बातम्या

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका
1

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती
2

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

राज्यातील 47 महसूल अधिकाऱ्यांना बढती; राज्य सरकारकडून दिवाळी भेट
3

राज्यातील 47 महसूल अधिकाऱ्यांना बढती; राज्य सरकारकडून दिवाळी भेट

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 
4

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.