Uddhav Thackeray at Azad Maidan for mill workers protest, unaided teachers protest
Uddhav Thackeray On Azad Maidan : मुंबई : देशाची अर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते. मुंबई शहराचा मुख्य कणा हा येथे असणाऱ्या गिरण आणि त्यामधील गिरणी कामगार आहेत. मात्र आता गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी गिरणी कामगार हे मुंबईचे भूमिपूत्र आहेत. त्यांना मुंबईमध्ये जागा मिळावी या उद्देशाने आंदोलन केले जात आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
मुंबईतील गिरणी कामगारांना हक्कांची जागा मिळण्यासाठी आणि मुंबईमध्ये त्यांना निवासस्थान देण्याबाबत हे आंदोलन सुरु आहे. गिरणी कामगारांचे मुंबईमध्येच पुर्नवसन करण्याबाबत ही मागणी सुरु आहे. गिरणी कामगार संयुक्त लढा समिती तर्फे आंदोलन पुकारल्यानंतर ठाकरे गटाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तसेच मनसे पक्षाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उपस्थित राहिले आहे. त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गिरणी कामगारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना कायम गिरणी कामगारांच्या पाठिशी राहील. जर गिरणी कामकागारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये रक्त सांडलं नसतं तर या राज्यकर्त्यांना सांगतो की तुमच्या बुडाखाली असणाऱी खुर्ची तुम्हाला मिळाली नसती. तेव्हा केंद्रातील सरकारला गुडघ्यावर आणलं आणि मुंबई राखली. आता पुन्हा एकदा दिल्लीच्या मालकाच नोकर येथे सत्तेवर बसले आहेत. ते मुंबईतील मराठी माणूस आणि गिरणी कामगार हे मुंबईबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी मुंबई ही सोन्याचे अंड देण्याची कोंबडी आहे. म्हणून आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो आम्ही हाणून पाडू, असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
त्याचबरोबर आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांच्या मागणींसाठी मोठे आंदोलन केले जात आहे. विनाअनुदानित शिक्षकांसाठी यासाठी सुरु असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दर्शवला आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे हे आझाद मैदानामध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर रोहित पवार हे देखील दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार हे देखील सहभागी झाले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विनाअनुदानिक शिक्षकांच्या आंदोलनामध्ये देखील उद्धव ठाकरे हे सहभागी झाले होते. यावेळी शिक्षकांचे मनोबल वाढवताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 2024 मध्ये शिक्षकांच्या अनुदानाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र आतापर्यंत अनुदान देण्यात आलेले नाही. आता आपण सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की ते उडून पडले पाहिजेत. मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. मी मुख्यमंत्री असताना अनुदानासाठी हो बोललो होतो. आता तुम्ही सगळे एकत्र मिळून राहिलात तर तुमच्या हक्काचे जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंंदोलनामध्ये मांडली आहे.