मुंबई – हिंदुत्व हिंदुत्व करत गायी वरती बोलताय ना. मग महागाई वर बोला. ही गाई आठवू द्यायची नाही म्हणून हिंदुत्वाचा डोस. खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे यांनी महागाईची आठवण करून दिली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन – उद्धव ठाकरे.
– हिंदुत्व भाजपने शिकवायची गरज नाही. अरे पाकिस्तानात जावून जिनाच्या थडग्यावर डोके टेकवणारी तुमच्या पक्षाची औलाद. पाकिस्तानात जावून तिथल्या पंतप्रधानांच्या वाढदिवासाच केक खाणारा तुमचा नेता. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार…उद्धव ठाकरेंची टीका.
– माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन, शिवरायांच्या साक्षीने मी सांगतो. माझ्यात आणि अमित शहांमध्ये अडीच-अडीच वर्षे सत्तावाटपाचे ठरले होते. मात्र, त्यांना शिवसेना संपवायची आहे. एवढ्यावरच नाही. माणसाची हाव किती असते. तिकीट दिला. उपमुख्यमंत्री केला. आता मुख्यमंत्री केला. त्याला आता शिवसेनाप्रमुख व्हायचेय. ही बाप चोरणारी औलाद. ना स्वतःचे विचार. उद्धव ठाकरेंची शिंदे आणि भाजपवर टीका.
– आनंद दिघे आज आठवतायत. मात्र, ते आपल्यात नाहीत. ते बोलू शकणार नाहीत. दिघे एकनिष्ठ होते. ते शेवटी सुद्धा भगव्यात गेले.
– यावर्षी रावण दहन होणारच, पण तो दहा डोक्यांचा नाही. तर एक्कावन खोक्यांचा बकासूर, धोकासूर आहे. मी आजारी असताना जबादारी सोपलेल्या कटप्पाने धोका दिला. उद्धव ठाकरेंची शिंदेवर जोरदार टीका.
– होय गद्दाराच, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत. पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. – उद्धव ठाकरे – शिवाजी पार्कवरले प्रेम ओरबाडून घेता येणार नाही. हे माझ्या शिवसैनिकांचे प्रेम आहे. मला अजूनही डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिली नाही. मात्र, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जावूच शकत नाही. – उद्धव ठाकरे. – विजया दशमीच्या शुभेच्छा देताना अनेक दसरा मेळावे लक्षात आहेत. मात्र, असा मेळावा अभूतपूर्व. मी भारावून गेलो आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू.