दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर म्हणाले...
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप होत असताना उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान आज त्यांनी माध्यमांसमोर यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरवेळी अधिवेशन आलं की, हा मुद्दा बाहेर काढला जातो. मागच्या दोन-तीन अधिवेशनात हा मुद्दा कसा आला नाही? याचंच मला आश्चर्य वाटलं होतं. दरवेळी हा मुद्दा काढला जातो, यात नवीन काहीच नाही. आरोपांमध्ये कोणतही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत असताना त्यांना दिशा सालियन प्रकरण आणि आदित्य ठाकरेंवर केले गेलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी ढीगभर आहेत आणि विरोधक मुठभर. त्यामुळे सगळं कामकाच रेटून नेलं जात आहे. राज्यपालही आपलं सरकार म्हणतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियन प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा, असेही ते म्हणाले आहेत. राजकीय दबावापोटी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या याचिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेवर (ठाकरे) जोरदार टिकास्र सोडले आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील तथा शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
दरवेळी अधिवेशन आलं की, हा मुद्दा बाहेर काढला जातो. मागच्या दोन-तीन अधिवेशनात हा मुद्दा कसा आला नाही? याचंच मला आश्चर्य वाटलं होतं. दरवेळी हा मुद्दा काढला जातो, यात नवीन काहीच नाही. आरोपांमध्ये कोणतही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. आमचे घराण्याच्या अनेक पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणाशी दूर दूर पर्यंत संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूला न्यायचे असेल तर सर्वांचीच पंचाईत होईल. कारण खोट्याचा आधार घेत असाल तर ते तुमच्यावरही उलटेल.