Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election : अखेर उद्धव ठाकरेंनी घातली भाजपला साद; ऐन निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकत्र?

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धठ ठाकरे भाजपसोबत पुन्हा जाणार का? याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र सिल्लोडमध्ये भाजप-ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 15, 2024 | 06:33 PM
अखेर उद्धव ठाकरेंनी घातली भाजपला साद; ऐन निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकत्र?

अखेर उद्धव ठाकरेंनी घातली भाजपला साद; ऐन निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकत्र?

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धठ ठाकरे भाजपसोबत पुन्हा जाणार का? याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी नसलं तरी सिल्लोडमध्ये भाजप-ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारां उद्धव ठाकरे यांनीच भाजपला हाक दिली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांनी आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं जाहीरपणे म्हटल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काही दिवसापूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही अब्दुल सत्तार यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्टपणे कळवलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेत मंचावर आणि समोरील गर्दीतही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. एकीकडे दररोज मोदी शहा फडणवीसांवर उद्धव ठाकरे हे हल्लाबोल करत आहेत पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाला सोबत येण्याचं आवाहन केलं. गद्दाराला गाडण्यासाठी, गुंडगिरी आणि सर्वसामान्याच्या छळ थांबवण्यासाठी एकत्र येऊ, असं ठाकरे म्हणाले आहेत.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका

कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवण्णाचा मोदी यांनी प्रचार केला होता. तर सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा उमेदवारही मोदींच्या मंचावर होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्यावरील जमिनी बळकावणाच्या आरोपाची यादीही वाचून दाखवली. जमीन बळकावली. भूखंड बळकावले. शासकीय मालमत्ता याबाबतच्या यादीचं करायचे काय? याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी सत्तारांना दिला आहे. 40 आमदार आणि मंत्रिपद देऊनही यांची भूकच शमत नाही. त्यामुळे सत्ता आली तर चौकशी करुन तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मतभेद असले तरी बोलायला तयार

उद्धव ठारेंनी यावळे सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. मतभेद असले तरी तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. ही संधी आहे. सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या पराभवासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवसेनेची संस्कृती, विचार वेगळे आहेत. सभेत मुस्लिम भगिनी बसल्या आहेत. सत्तारांनी जमीन बळकावल्या. भूखंड पळवले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर भिंत बांधली, सर्वे नंबर 92 अनाधिकृत भूखंड ताब्यात घेतल्याचा आरोप  त्यांनी केला आहे.

Web Title: Uddhav thackeray shiv sena and bjp passibility alliance in sillod constituency against abdul sattar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री
1

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
2

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप

“सत्ताधारी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा निषेध!”; ठाकरे गटाचा सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा
3

“सत्ताधारी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा निषेध!”; ठाकरे गटाचा सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
4

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.