Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार; वाचा नेमकं काय आहे कारण

Uddhav Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आज विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत. मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणानंतर (Maratha Reservation) उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विधेयकाच्या चर्चेसाठी विधीमंडळाच्या विधानपरिषदेच्या सभागृहात हजेरी लावली.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 20, 2024 | 06:43 PM
Uddhav Thackeray on Maratha Reservation : Uddhav Thackeray said for the first time, thanks to Chief Minister Eknath Shinde, but..

Uddhav Thackeray on Maratha Reservation : Uddhav Thackeray said for the first time, thanks to Chief Minister Eknath Shinde, but..

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणानंतर (Maratha Reservation) उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विधेयकाच्या चर्चेसाठी विधीमंडळाच्या विधानपरिषदेच्या सभागृहात हजेरी लावली. यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते”

मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला आहे. मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. आंदोलकांची जी डोकी फोडली गेली, ते न करता देखील आरक्षण देता येईल. टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले आहे. किती जणांना नोकऱ्या मिळतात हे बघावं लागेल. दोन मते असती तर आम्ही एकमत दिले नसते. मुख्यमंत्री काय आहेत कसे आहेत त्यांचा इतिहास सर्वाना माहिती आहे. जनतेचा विश्वास मुख्यमंत्री यांच्यावर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर आरक्षणाला धक्का नको
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. “छगन भुजबळ असो किंवा इतर कोणी असो दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एकमताने ठराव मंजूर केला होता. हायकोर्टात ते आरक्षण टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. टीम तीच होती आता आरक्षण टिकावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. टायमिंगच्या बरोबरीने वृत्ती महत्वाची असते. भाजपची वृत्ती चांगली असती तर त्यांच्यावर फोडाफोडीची वेळ आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सगेसोयरेंच्या मुद्यावरुन जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. दरम्यान, सगेसोयरेंचा मुद्दा आजच्या विधेयकात न घेतल्याने जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच आहोत. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे.

 

Web Title: Uddhav thackeray thanks cm eknath shinde on maratha reservation read what exactly is the reason nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2024 | 06:40 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Maratha community

संबंधित बातम्या

Banjara Samaj : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आक्रमक; नेमकं काय आहे मागणी?
1

Banjara Samaj : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आक्रमक; नेमकं काय आहे मागणी?

कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन
2

कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन

मराठा समाजानंतर आता बंजारा समाज उतरला रस्त्यावर; आरक्षणासाठी काढला मोर्चा
3

मराठा समाजानंतर आता बंजारा समाज उतरला रस्त्यावर; आरक्षणासाठी काढला मोर्चा

मराठा समाजानंतर आता ‘हा’ समाज आरक्षणासाठी आक्रमक; हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची केली गेली मागणी
4

मराठा समाजानंतर आता ‘हा’ समाज आरक्षणासाठी आक्रमक; हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची केली गेली मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.