Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी; उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात भालेराव यांच्या विरोधात अनेक पक्षविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व संघटनेतून करण्यात आलेल्या या तक्रारींमध्ये, पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि संघटनेच्या निर्णयांना मान्यता न देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2024 | 08:37 AM
भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी; उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी; उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

Follow Us
Close
Follow Us:

उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तभंगाच्या आरोपांवर ही कारवाई करण्यात आली असून, उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणीला देखील बरखास्त करण्यात आले आहे. भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली असून, पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हेदेखील वाचा- धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद, बीएमसी पथकाला रोखलं, जमाव रस्त्यावर

भालेराव यांच्यावर अजून कोणती कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झाले आहे. भगवान भालेराव यांच्या हकालपट्टीमुळे पक्षात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भालेराव यांना पक्षातून हाकलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाने भगवान भालेराव यांना रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीतून उल्हासनगर शहराध्यक्ष आणि उपमहापौर पदासारखी महत्त्वाची जबाबदारी दिली होती. मात्र, अलीकडच्या काळात भालेराव यांच्या विरोधात अनेक पक्षविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या.

पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व संघटनेतून या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे दिसून आले आहे. या तक्रारींची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

हेदेखील वाचा- धक्कादायक! टॅक्सी चालकाने वरळी सी लिंकवरून उडी मारून संपवलं जीवन, पोलीस तपासानंतर कारण आलं समोर

पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व संघटनेतून करण्यात आलेल्या या तक्रारींमध्ये, पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि संघटनेच्या निर्णयांना मान्यता न देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. पक्षाच्या या तक्रारींवर गंभीर विचार करून अखेर पक्ष निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी भगवान भालेराव यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, उल्हासनगर शहर कार्यकारिणी देखील याच कारणांमुळे त्वरित बरखास्त करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे ठाणे प्रदेश संपर्क प्रमुख सुरेश बारशिंग यांनी ही अधिकृत घोषणा केली.

पक्षाची उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी लवकरच नव्या नेतृत्वाखाली पुनर्रचनेत येईल आणि पक्षाच्या नवीन संघटनेचा विचार करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात येईल. या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतील, असे बारशिंग यांनी यावेळी सांगितले.

भगवान भालेराव यांच्या हकालपट्टीमुळे पक्षात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भालेराव यांना पक्षातून हाकलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे, तर विरोधकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. या घटनांमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भालेराव यांच्या हकालपट्टीमुळे त्यांच्या आगामी राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांच्या समर्थकांना या निर्णयाचा धक्का बसला आहे, तर विरोधकांनी पक्षाच्या या कठोर निर्णयाचे समर्थन केले आहे.

Web Title: Ulhasnagar city president bhagwan bhalerao suspended from republican party of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • Republican Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.