धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद, बीएमसी पथकाला रोखलं, जमाव रस्त्यावर
मुंबईतील धारावीतून मोठी बातमी समोर आली आहे. धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. धारावीत असणाऱ्या मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी बीएमसीचे एक पथक आज धारावीत गेलं होते. मात्र यामुळे तेथे वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीएमसीचं पथक धारावीत गेलं असतं तेथील नागरिकांनी या पथकाला कारवाई करण्यापासून अडवलं. तसेच बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर देखील दगडफेक केली.
हेदेखील वाचा- धक्कादायक! टॅक्सी चालकाने वरळी सी लिंकवरून उडी मारून संपवलं जीवन, पोलीस तपासानंतर कारण आलं समोर
या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शिवाय मशिदीवरील कारवाई रोखण्यासाठी धारावीत शेकडोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळत आहे. धारावील वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिध्द ठिकाण असलेल्या धारावीत एक मशिद आहे. मात्र या मशिदीचा काही भाग अवैध्य असल्याचं सांगितलं जात आहे. धारावी शहरातील ९० फूट रोडवरील २५ वर्ष जुनी अशी ही सुभानिया मशीद आहे. ह्या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी आज बीएमसीचं पथक धारावीच्या दिशेने रवाना झालं होतं. मशिदीचा अवैध्य भाग तोडला जाणार आहे, ह्याची माहिती धारावीतीली नागरिकांना होती. त्यामुळे ही कारवाई रोखण्यासाठी नागरिकांनी रात्री पासूनचं आंदोलन सुरु केलं होते. धारावीत लोकांचं म्हणणं आहे की, ही मशिद 25 वर्षे जुनी आहे. मशिदीसोबत लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही मशिद पाडू नये.
हेदेखील वाचा- मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा
परंतु बीएमसी अधिकाऱ्यांनी आज ह्या मशिदीचा अवैध्य भाग पाडण्यासाठी धारावीकडे रवाना झाले. त्यामुळे धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही, अशी ठाम भुमिका धरावीकरांनी घेतली आहे. यासाठी शेकडोंचा जमाव देखील रस्त्यावर उतरला आहे. धारावीतील नागरिकांनी मशिदीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या बीएमसी अधिकाऱ्यांना रोखलं. तसेच त्यांच्या गाड्यांची देखील तोडफोड केली. त्यामुळे धारावीतील परिस्थिती गंभीर झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये, यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदाराने X वर पोस्ट करून लिहिले की, धारावीतील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीला बीएमसीने पाडण्याच्या नोटीसबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कारवाई रोखली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांना पत्राद्वारे आवाहन:
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेने धारावीतील हिमालय हॉटेलजवळील मेहबूब-ए-सुबानिया मशीद पाडण्याची नोटीस दिल्याचे लिहिले आहे. ही मशीद अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने (डीआरपी) या मशिदीच्या अतिक्रमणाची चौकशी करावी. मशिदीच्या अतिक्रमणाबाबत डीआरपीचा तपास अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत सुधारात्मक कारवाई करण्याची नोटीस पाठवली आहे. डीआरपीचा तपास अहवाल येईपर्यंत मुंबई महानगरपालिकेची ही कारवाई स्थगित करावी अशी विनंती राज्याचे प्रमुख या नात्याने आम्ही करतो.