eknath shinde and narayan rane
मुंबई – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात एकिकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असताना, आणि भाजपा नेत्यांची महापुरुषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य ही प्रकरणं ताजी असताना राज्याच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षा या ठिकाणी नारायण राणे भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिका आय़ुक्त इक्बाल सिंग चहल हे देखील उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, आज सांयकाळी साडेचार वाजता माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू येथील अधिश या बंगल्याचे अनाधिकृत बांधकाम स्वत:च तोडले होते. त्यामुळं या विषयावर आयुक्तांच्या समवेत नारायण राणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच मुंबईतील छोट्या व्यवसायाबाबत या भेटीत चर्चा होणार आहे. नारायण राणे यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका आय़ुक्त इक्बाल सिंग चहल हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला असणार आहेत. त्यामुळं या तिघांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून, चर्चांना उधाण आलं आहे.