दरम्यान अचानक पणे सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली.
सामानांची बांधाबाध करताना व्यापारी वर्गाची त्रेधा उडाली होती. हातकणंगलेचा बाजाराचा दिवस शहरवासीयांसह परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार खरेदीसाठी बाजारात आले होते. अचानकपणे धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे एकच धावपळ उडाली, मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसह ग्राहकानी आश्रय घेतला. अशीच परिस्थिती, इचलकरंजी, कुंभोज, कोरोची, आळते, पेठ वडगाव येथे पहावयास मिळाली. सुमारे तासभर धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे बघेल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान
मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली. सोमवारी लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान; ऐन उन्हाळ्यात ओढ्यांना पूर तर नाशिकमध्ये 14 हजार शेतकऱ्यांचे नुकसान
येडशी, येरमाळा भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस
लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील येणेगूर परिसरात सोमवारी आठवडी बाजारादिवशी विद्युत खांबावर वीज पडल्याने वीज वाहक तार तुटून आठवडी बाजारात आलेल्यावर पडले. त्या तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यामध्ये दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, भूम आणि धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी झाला.
उष्णता कमी पण शेतकऱ्यांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.