Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका; 117 गावात नुकसान

शिराळा तालुक्यातील २६४ शेतकऱ्यांचे २२ गावांतील ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2025 | 12:45 PM
राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं

राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं

Follow Us
Follow Us:

सांगली : ऐन उन्हाळ्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. 117 गावांतील 604 शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील 14 दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 238 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत.

दरम्यान, उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या. मात्र, मागच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र, शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत बागायती पिकांचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका याच तालुक्यांना सर्वाधिक बसतो. शिराळा तालुक्यातील २६४ शेतकऱ्यांचे २२ गावांतील ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वाळवा तालुक्यातील ७० शेतऱ्यांचे १७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

“उन्हाळी भाजीपाला, फळबागाचे नुकसान झाले आहे, उन्हाळ्यातील पाणीटंचाई होती, सामना करत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या. मात्र, हातच गेलं आहे, याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. ”

– राहुल पाटील, शेतकरी

Web Title: Unseasonal rains hit crops on 200 hectares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Rain Update
  • Sangli Rain

संबंधित बातम्या

Weather Update : महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी…
1

Weather Update : महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी…

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
2

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
3

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.