Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pro Kabaddi League 11 : रोमांचक सामन्यात युपी योद्धाजची यु-मुम्बावर मात; अवघ्या 2 गुणांच्या फरकाने विजय

प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सेशनमध्ये यु मुम्बा आणि युपी योद्धाज यांच्यात अत्यंत चुरशीच्या सामन्यात यु मुम्बाला रोखण्यात युपी योद्धाजला चांगलेच यश आले. युपी योद्धाने 29-27 ने रोमांचक विजय मुंबईवर प्राप्त केला.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 16, 2024 | 02:48 PM
UP Yoddhas Beat U Mumba in Pro Kabaddi League 11 and 29-27 win in a Close Match at Balewadi Pune

UP Yoddhas Beat U Mumba in Pro Kabaddi League 11 and 29-27 win in a Close Match at Balewadi Pune

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : भवानी राजपूत, गगन गौडा आणि भरतच्या यशस्वी चढायांच्या जोरावर युपी योद्धाजने रविवारी प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यु मुम्बावर चुरशीच्या सामन्यात २९-२७ असा विजय मिळविला. या विजयाने युपी योद्धाजने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चढाईपटूंना आलेले अपयश आणि युपी योद्धाजच्या गगन गौडा, भरत, भवानी राजपूत या उंचपुऱ्या चढाईपटूंना रोखण्यात आलेले अपयशच यु मुम्बाच्या पराभवास कारणीभूत ठरले. मनजीत, अजित चौहान यांनी अनुक्रमे ४ आणि ५ गुणांचीच कमाई केली. युपीकडून भवानी राजपूतकडून ७ आणि गगन गौडाने ५ गुणांची कमाई केली. हितेश आणि सुमितचा बचावही युपीसाठी महत्वाचा ठरला.

भवानी राजपूत, गगन गौडाच्या यशस्वी चढाया

पूर्वार्धातील सामन्यात युपी योद्धाज संघाने बचावपटूंच्या जोरदार प्रयत्नांच्या जोरावर आपली बाजू सुरक्षित राखली होती. तुलनेत यु मुम्बा संघाला चढाईपटूंनी हात दिला. मात्र, युपीच्या भवानी राजपूत आणि भरत, गगन गौडा या उंचापुऱ्या चढाईपटूंना रोखणे मुंबईच्या बचावपटूंना कठिण गेले. परिणामी अत्यंत सावध झालेल्या पूर्वार्धातील खेळात मध्यंतराला युपी योद्धाज संघाला १३-१२ अशी एका गुणाची आघाडी घेता आली होती.

सलग सहा सामन्यात अपराजित, दोन बरोबरी

उत्तरार्धात युपी योद्धाज संघाने सामन्याला वेग घेतला. भवानी राजपूतच्या वेगवान चढायांनी चोख काम बजावत उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटांत यु मुम्बा संघावर लोण चढवत आपली आघाडी २४-१६ अशी भक्कम केली. उत्तरार्धात यु मुम्बाच्या चढाईपटूंनाही यश आले नाही. सामन्यातील या तिसऱ्या सत्रात युपीने ११ गुणांची कमाई केली, तर मुम्बा संघाला चारच गुण मिळवता आले. मात्र, राखीव खेळाडू सौरभ राऊत आणि रोहित राघव यांच्या खोलवर चढायांनी यु मुम्बाने बाजी पलटवली आणि चार मिनिटे बाकी असताना युपीवर लोण चढवत २५-२६ अशी पिछाडी कमी केली. सामन्याला दीड मिनिट बाकी असताना सौरभच्या यशस्वी चढाईने सामन्यातील रंगत वाढली होती. युपीची आघाडी एका गुणाचीच होती. अखेरच्या चढाईत मात्र युपीने रोहित राघवची पकड करुन २७-२९ अशी आघाडी वाढवली आणि याच आघाडीवर युपीने विजयाला गवसणी घातली.

Web Title: Up yoddhas beat u mumba in pro kabaddi league 11 and 29 27 win in a close match at balewadi pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • PKL 11
  • Pro Kabaddi League-11
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?
1

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;
2

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
3

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार
4

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.