Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा – मंगलप्रभात लोढा

१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री लोढा म्हणाले की, “मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे करावे. तसेच ज्या बालकांना गोवरची लागण झाली आहे त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 15, 2022 | 05:50 PM
मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा – मंगलप्रभात लोढा
Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिले. हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

[read_also content=”धनुष्यबाण चिन्हाप्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार – न्यायालय https://www.navarashtra.com/india/power-of-election-commission-to-take-decision-in-case-of-symbol-court-345094.html”]

पालकमंत्री लोढा म्हणाले की, “मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे करावे. तसेच ज्या बालकांना गोवरची लागण झाली आहे त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावेत”. यावेळी बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी तसेच सहआयुक्त, उपआयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी १८८ कोटींची तरतूद

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म, उद्याने, मंडई, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, सागरी किनारे, पर्यटन स्थळे, फ्लायओव्हर या ठिकाणांची मिशन मोडमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. ३९०० स्वच्छतागृहांची दुरूस्ती, नव्याने उभारणी करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री लोढा यांनी यावेळी दिली.

स्वच्छ व सुंदर मुंबई अभियानात शासकीय तसेच निमशासकीय संस्थांबरोबरच नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले यांना सहभागी करून अभियान सर्वसमावेशक करणे, अभियान कालावधीत सर्वस्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमुलाग्र बदल (Behavioral Change) घडवून आणणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले.

Web Title: Urgent measles vaccination campaign for children in mumbai suburban district mangalprabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2022 | 05:50 PM

Topics:  

  • Mangalprabhat Lodha
  • Mumbai Suburban

संबंधित बातम्या

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा
1

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.