Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Sewage Tunnel : पश्चिम उपनगरांतील मलनिःसारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-1 प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. जुलै 2027 पर्यंत तो कार्यरत होण्याची शक्यता आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 11, 2026 | 08:02 PM
Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Follow Us
Follow Us:
  • 5.8 किमी भूमिगत मलजल बोगद्याचा अंतिम ब्रेक-थ्रू यशस्वी
  • 31 जुलै 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
  • पश्चिम उपनगरांना दिलासा
 

पश्चिम उपनगरांतील मलनिःसारण व्यवस्था (Sewage Tunnel)अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेतलेल्या प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-1 प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. बोरिवलीतील डॉन बॉस्को स्कूल जंक्शन ते मालाडमधील मालवणी येथील नवीन मालाड उदंचन केंद्रादरम्यान बांधण्यात येणाऱ्या 5.8 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याचा अंतिम ‘ब्रेक-थ्रू’ शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाला. हा संपूर्ण प्रकल्प 31 जुलै 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

मुंबईतील मलजलावर योग्य प्रक्रिया करणे, समुद्र आणि नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, जलप्रदूषणाला आळा घालणे आणि मलनिःसारण यंत्रणेवरील ताण कमी करणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. मुंबई मलनिःसारण प्रकल्प विभागामार्फत या कामाची अंमलबजावणी केली जात आहे.

5.8 किमीचा भूमिगत बोगदा

नवीन मालाड उदंचन केंद्रापासून डॉन बॉस्को स्कूल जंक्शनच्या दिशेने बोगद्याचे खोदकाम करण्यात आले. ‘सेगमेंटल लायनिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बोगद्याचा अंतर्गत व्यास 3.2 मीटर आहे. या बोगद्याची मलजल वाहून नेण्याची क्षमता प्रतिदिन 1 हजार 182 दशलक्ष लिटर इतकी आहे. प्रकल्पात पाच शाफ्ट, तीन ड्रॉप शाफ्ट आणि सहा स्क्रीन चेंबर्सचा समावेश आहे.

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

चार उदंचन केंद्रांवरील अवलंबित्व कमी होणार

गोराई, शिंपोली, चारकोप आणि मालाड या चार उदंचन केंद्रांकडे येणारे मलजल या बोगद्याद्वारे वाहून नेले जाणार आहे. त्यामुळे या केंद्रांची गरज कमी होणार असून, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे. मलजल व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यासोबतच पर्यावरण संरक्षणालाही मदत होणार आहे.

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

सहा परिसरांना दिलासा

दहिसर, बोरिवली, गोराई, चारकोप, मालाड आणि कांदिवली या पश्चिम उपनगरांमध्ये वाढत्या मलजलामुळे विद्यमान मलनिःसारण वाहिन्यांवर ताण येत आहे. काही ठिकाणी या वाहिन्यांची क्षमता अपुरी पडत आहे. नवीन भूमिगत बोगद्यामुळे मलजल वाहून नेण्याची क्षमता वाढून जुन्या वाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करून जुलै 2027 पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

Web Title: Mumbai sewage tunnel project 90 percent complete july 2027 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • BMC
  • Management
  • Mumbai Suburban

संबंधित बातम्या

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत
1

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
2

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.