VBA leader Prakash Ambedkar gives Reaction on Akshay Shinde Encounter
मुंबई : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांसोबतच्या झटपटीमध्ये हा एन्काऊंटर झाला असून विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र या एन्काऊंटरवरुन राज्य सरकारला एकप्रकारे घेरले आहे. बेड्या असलेला आरोपी पोलिसांच्या हातातील बंदूक घेतो कसा असा सवाल महाविकास आघाडीचे नेते उपस्थित करत आहेत. विरोधकांच्या या टीकेला सत्ताधारी भाजप नेत्यांकडून देखील सडेतोड उत्तर दिले जात आहे. या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बदलापूरमध्ये त्या लहान मुलींसोबत घटना घडली, तेव्हा अगोदर आरोपींना शोधण्यात शिंदे फडणवीस सरकार कमी पडलं. मदतनीस कसे मोकळे सुटतील याची काळजी घेतली गेली, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Justice is incomplete without adapting the due course of law.
The Badlapur sexual assault was a complete failure of the Eknath Shinde and BJP-led Maharashtra government !!!
The accused has been shot while trying to escape but we hope that the police would soon release the…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 24, 2024
पुढे ते म्हणाले की, या प्रकरणातील आरोपीला दुसऱ्या केसमध्ये घेऊन जात असताना त्याने रिव्हॉल्व्हर हिसकून घेतले फायरींग केलं त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे, त्याच्यासोबत आमची सहानुभूती आहे. मात्र, शासनाने त्यांचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा, त्याला कुठे गोळी लागली त्याची संपूर्ण माहिती द्यावी, त्यामुळे जी आता चर्चा सुरू आहे ती थांबेल, आता ज्या केसमध्ये आरोपीला घेऊन जात होते, त्याच्या बायकोच्या तक्रारीबाबत त्याला घेऊन जात होते, नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते त्याचा खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पुढे त्यांनी बदलापूर प्रकरणातील एन्काऊंटरवरुन कायद्यामधून न्याय दिला पाहिजे अशी भूमिका मांडली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कायद्याच्या योग्य पद्धतीशी जुळवून घेतल्याशिवाय न्याय अपूर्ण आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार हे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे पूर्ण अपयश आहे. आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात गोळी मारण्यात आली आहे. पण, आम्हाला आशा आहे की, आरोपीने ज्या पोलिसाला गोळ्या घातल्या होत्या, त्याचा वैद्यकीय अहवाल पोलीस लवकरच जाहीर करतील जेणेकरून हा कट होता की नाही ते स्पष्ट होईल. पोलिसांनी बदली नियमावलीचे पालन केले असते आणि संध्याकाळी 5 नंतर त्यांची बदली केली नसती तर ही संपूर्ण घटना टाळता आली असती असंही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.