various initiatives organized in kalyan on the occasion of the birthday of chief minister eknath shinde and mp dr shrikant shinde nrvb
दत्ता बाठे, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) बाळासाहेबांची शिवसेना (ShivSena BalasahebThackeray Group) कल्याण शहरातर्फे (Kalyan City) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर (Kalyan West MLA Vishwanath Bhoir) आणि शहर प्रमुख रवी पाटील (City Chief Ravi Patil) यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येत्या ४ फेब्रुवारी रोजी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा तर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आमदार भोईर आणि शहरप्रमुख पाटील यांच्यातर्फे ४ फेब्रुवारीपासून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ४ फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिमेतील सिद्धी विनायक गार्डन हॉल (Siddhi Vinayak Garden Hall, Kalyan West) येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे (medical camp) आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे तीन ते चार हजार नागरिक सहभागी होणार आहेत.
[read_also content=”ही महिला करते बिकिनी घालून शेती, सोशल मीडियावर झाली ट्रोल, आता दिलंय सडेतोड उत्तर https://www.navarashtra.com/viral/woman-farmer-does-farming-in-bikini-trolled-on-social-media-now-gave-such-a-befitting-reply-viral-on-social-media-nrvb-366727.html”]
पाहा व्हिडिओ :
तसेच ५ फेब्रुवारी रोजी दुर्गाडी चौक ते यशवंतराव चव्हाण क्रीडांगण अशी सायक्लोथॉन स्पर्धा होणार असून यामध्ये सातशे सायकलपटू सहभागी होणार आहेत. तर ७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे सकाळी ८ ते १० या वेळेत चित्रकला, निबंध लेखन, योगा आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा असेल. तर त्याचदिवशी सायंकाळी ५ ते ८ यावेळेत गायन, वादन, नृत्य, लोककला, पारंपरिक कला, लावणी, बाल काव्यवाचन आदी स्पर्धा होणार असल्याची माहिती आयोजक आमदार विश्वनाथ भोईर आणि शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.
या सर्व स्पर्धा विनामूल्य असून ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंराव चव्हाण क्रीडांगण येथे त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, दत्ता गिरी, अकुंश जोगदंड, माहिला पदाधिकारी छाया वाघमारे, नेत्रा उगले आदी उपस्थित होते.
[read_also content=”१ महिना, ४६ हल्ले आणि ४९ ठार…. तेहरीक-ए-तालिबान ठरला दहशतवादी पाकसाठी ‘भस्मासूर’! https://www.navarashtra.com/crime/ttp-umar-media-releases-report-on-its-terror-activity-46-attacks-majority-in-kp-province-pakistan-tehrik-i-taliban-resurgence-in-pakistan-nrvb-366703.html”]