महाकाल मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यास बंदी आहे. मागील वर्षभरापासून ही बंदी आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.
रेल्वेची पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित झाली असून त्यामुळे एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने लोकलच्या फेऱ्या वाढल्या आहेत, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली.
कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भव्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे डोंबिवली शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अमोल ने साकारलेला राज ठाकरे यांच्या सभेचा देखावा शहरात चर्चेचा विषय ठरलाय . मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या देखाव्याला भेट देत गव्हाणे यांचे कौतुक केले.
येत्या ४ फेब्रुवारी रोजी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा तर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आमदार भोईर आणि शहरप्रमुख पाटील यांच्यातर्फे ४ फेब्रुवारीपासून…