Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! 2 दिवसांत 25 ते 30 आगीच्या घटना; पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीच्या उत्सवात वसई-विरार शहरात गेल्या दोन दिवसांत २५ ते ३० आगीच्या घटना घडल्या असून, वसई पूर्वेला महापालिकेच्या जागेत डम्प केलेल्या पीव्हीसी पाईप्सना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 10, 2026 | 09:49 AM
दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! ( सौजन्य - सोशल मीडिया )

दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आनंदाच्या सणात भीतीचे सावट!
  • वसई-विरारमध्ये २५-३० ठिकाणी लागली आग
  • प्रशासनाच्या कारभारावर नगरसेवकांचा हल्लाबोल
Vasai Virar Diwali Fire : दिवाळीच्या उत्सवात वसई-विरार शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत शहरात छोट्या-मोठ्या मिळून तब्बल २५ ते ३० आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, वसई पूर्व येथे ट्रॅफिक पोलिसांच्या गोडाऊनशेजारील स्मशानभूमीजवळ अनधिकृतपणे डम्प केलेल्या पीव्हीसी पाईपलाईनला दुपारी चार ते सव्वाचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते, जे वसई-विरारच्या अनेक भागांतून दिसत होते. ( Vasai Virar Diwali Fire ) 

Nalasopara Police : रस्ते गिळणाऱ्या गॅरेजचालकांवर पोलिसांचा बडगा! नालासोपारात चार जणांविरोधात गुन्हे दाखल

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. कंत्राटदाराचे काम पूर्ण होऊनही महापालिकेच्या जागेवरच हे जुने पीव्हीसी पाईप टाकून ठेवण्यात आले होते. वाढती उष्णता, सुकलेले गवत आणि फटाके किंवा रॉकेटची ठिणगी पडल्याने ही आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त

या घटनेनंतर भाजप नगरसेवक विशाल जाधव यांनी महापालिका आणि पोलिस ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. महापालिकेच्या जागेत खासगी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप कंत्राटदाराचा माल ठेवण्याबाबत गटनेते अशोक शेळके यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच तक्रार केली होती. महासभेतही रस्त्यावरील पाईप आणि बेवारस वाहनांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.

यामुळे आगीचे प्रकार वाढताहेत

आचोळे पोलिस स्टेशनबाहेर जप्त केलेल्या गाड्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या कचरा गाड्यांजवळ गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने आगीचे प्रकार घडत आहेत. सकाळी अकराच्या सुमारास वीणा डायनेस्टीबाहेर एका गाडीला, तर इम्पेरियल इमारतीजवळही आगीची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

मैदानातच फटाके फोडण्याचे आवाहन

वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी २१ मजली इमारतींच्या आवारात उंच जाणारे ‘फॅन्सी शॉट्स’ किंवा रॉकेट न फोडता मोकळ्या मैदानातच फटाके फोडावेत, जेणेकरून इतरांची दिवाळी खराब होणार नाही आणि जीवितहानी टळेल, असे आवाहन अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के व नगरसेवक विशाल जाधव यांनी केले आहे.

मोकळ्या मैदानातच सुरक्षितपणे फटाके फोडा

दुपारी सव्वाचारच्या सुमारास स्मशानभूमीजवळ पीव्हीसी पाईपला आग लागल्याचा कॉल आला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या उष्णतेमुळे सर्वत्र गवत सुकलेले आहे. दिवाळीत आतापर्यंत शहरात २५ ते ३० आगीच्या घटना घडल्या असून, नागरिकांनी गर्दीच्या व इमारतींच्या परिसरात फटाके न फोडता मोकळ्या मैदानातच सुरक्षितपणे फटाके फोडावेत. – विशाल शिर्के, अग्निशमन अधिकारी

महापालिकेच्या जागेत कंत्राटदारांचे पाईप आणि रस्त्यांवर कचऱ्याच्या गाड्या डम्प केल्या जात आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. नागरिकांनीही उंच टॉवर्सच्या आवारात फॅन्सी फटाके न फोडता मोकळ्या मैदानात दिवाळी साजरी करावी.
– विशाल जाधव, नगरसेवक

Mira Bhayandar : शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार! प्रशासकीय दिरंगाईमुळे 40 कंत्राटी शिक्षक 6 महिन्यांपासून वेतनाविना

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीच्या काळात वसई-विरारमध्ये आगीच्या किती घटना घडल्या आहेत?

    Ans: गेल्या दोन दिवसांत वसई-विरार शहर परिसरात लहान-मोठ्या मिळून तब्बल २५ ते ३० आगीच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

  • Que: वसई पूर्वेला लागलेल्या भीषण आगीचे प्राथमिक कारण काय मानले जात आहे?

    Ans: महापालिकेच्या जागेवर कंत्राटदाराने निष्काळजीपणे टाकून ठेवलेले पीव्हीसी पाईप, ऑक्टोबर-नोव्हेंबरची वाढती उष्णता, सुकलेले गवत आणि फटाके किंवा रॉकेटची ठिणगी पडल्यामुळे ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • Que: वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काय आवाहन केले आहे?

    Ans: उंच इमारतींच्या (टॉवर्स) आवारात किंवा गजबजलेल्या भागात 'फॅन्सी शॉट्स' व रॉकेट न फोडता नागरिकांनी मोकळ्या मैदानातच सुरक्षितपणे फटाके फोडावेत, असे आवाहन अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के यांनी केले आहे.

Web Title: Vasai virar diwali fire incidents pvc pipe fire marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Diwali
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित
1

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
2

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये आगींचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग
3

Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये आगींचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
4

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.