संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी देशमुखांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. पुण्यातून वसंत देशमुख यांना अटक करण्यात आली.पण अटकेच्या अवघ्यां यावरून संगमनेरमध्ये राजकारणही चांगलंच तापलं होत. पण अटकेनंतर अवघ्या २४ तासांचं आताच वसंत देशमुख यांना जमीनही मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली होती.
यासंदर्भात संगमनेरच्या पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत देशमुख यांची तब्येत बिघडली. त्याचे बायपास झाले असल्याने संगमनेरमध्ये त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाशिकयेथील रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालयातही नेण्यात आले होते.
हेही वाचा: Sangamner Politics : जयश्री थोरातांविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरण; वसंतराव देशमुख आहेत कुठे?
दरम्यान, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे अहमदनगरचं राजकारणही चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता वसंतराव देशमुख यांना संगमनेर पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांची संगमनेरमधील धांदरफळ येथील सभा झाली. या सभेत विखे पाटील यांचे समर्थक वंसतराव देशमुख यांनीही भाषण केले. यावेळी बोलताना वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे संगमनेरमधील राजकारण चांगंलच तापलं होतं.
वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर संगमनेरमध्ये हिंसाचार उफळला. सभेत सहभागी झालेले अनेक नेत्यांवर टिकेची झो़ड उठू लागली. दगडफेक झाली, वाहने जाळली गेली. संगमनेर पोलिस (Police) ठाण्यात वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण विखे पाटील यांच्या सभेतील भाषणानंतर वसंतराव देशमुख पसार झाले होते. त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते.
हेही वाचा: Maharashtra Election 2024 : ८८ मतदारसंघात दलित मतदारांची भूमिका ठरणार
वसंतराव देशमुखांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही रवाना झाले. त्यानंतर आज वंसतराव देशमुख यांना आज संगमनेर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांविषयी केलेले आक्षेपार्ह विधाने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली होती. महाविकास आघाडीसोबतच महायुतीतील नेत्यांनीही वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विशेष म्हणजे सुजय विखे पाटील यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला . वसंतराव देशमुख यांच्या विधानाच आणि भाजपच कोणताही संबंध नसल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई कऱण्याची मागणीही करण्यात आली. तसेच आपण पोलिसांना या प्रकरणात सर्व सहकार्य करू असेही विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.