Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवार आरक्षणावरुन ओतत आहेत आगीत तेल’; प्रकाश आंबेडकर यांची संतप्त टीका

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. आरक्षणावरुन ते आगीत तेल ओतत आहेत अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 30, 2024 | 11:03 AM
प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार यांच्यावर निशाणा

प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार यांच्यावर निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

लातूर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. महायुती सरकारसमोर आरक्षणावरुन मोठा पेच निर्माण झाला असून अनेक राजकारण्यांनी या मुद्द्यांवरु प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा असला की जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आवश्य घेतले जाते. सध्या ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षण ओबीसीमधून देऊ नये यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव यात्रा काढली आहे. ही यात्रा लातूरमध्ये असताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी आरक्षणावरुन आगीत तेल ओतत आहेत अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे?

जेष्ठ शरद पवार यांनी आरक्षणावरुन मत मांडले. या राज्याचा प्रश्न असून तो राज्यामध्येच सोडवावा लागेल अशा आशयाची भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका न मांडल्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षांनी टीकास्त्र डागलं आहे. लातूरमध्ये ओबीसी बचाव यात्रा असताना प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल उतरण्यासाठी उतरले आहेत. शरद पवार आगीत तेल ओतत आहेत. नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारण काय? नामांतर होऊन इतकी वर्षे झाली आहेत. फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का? हा मुद्दा आत्ता उपस्थित करुन शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे? नामांतराचा मुद्दा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. त्या मुद्द्याला शरद पवार ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते या माध्यमातून करत आहेत.” अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर केली आहेत.

जरांगे पाटील यांनी 288 जागा लढव्यावात

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहे. ओबीसीमधून सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्यात याव्या अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. सरकारला जरांगे पाटील यांनी मागणी मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवणारा असल्याचा इशारा दिला आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंनी २८८ जागा लढवल्या पाहिजेत, त्यांची मागणी मान्य झाली नाही तर त्यांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे. सर्वसामान्य मराठ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मनोज जरांगेंनी २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठ्यांचे प्रश्न दाबून टाकतो आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.

Web Title: Vba prakash ambedkar criticized ncp leader sharad pawar over reservation issue nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 10:58 AM

Topics:  

  • Maratha Reservation
  • OBC Reservation
  • Prakash Ambedkar
  • Reservation News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.