Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veer Jiwaji Mahale : वाईत वीर जीवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीचा उत्साह; भव्य शोभायात्रा, मर्दानी खेळांनी वेधले लक्ष

Veer Jiwaji Mahale : वाई आणि कोंढवली येथे वीर जीवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्योत प्रज्वलन, स्मृतीस्थळाचे पूजन, भव्य शोभायात्रा आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांतून त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 11, 2026 | 09:14 PM
वाईत वीर जीवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीचा उत्साह; भव्य शोभायात्रा, मर्दानी खेळांनी वेधले लक्ष

वाईत वीर जीवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीचा उत्साह; भव्य शोभायात्रा, मर्दानी खेळांनी वेधले लक्ष

Follow Us
Follow Us:
  • शिवकालीन वेशभूषेतील सहभागी हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले 
  • वीर जीवाजी महालेचें शौर्य आणि योगदान प्रेरणादायी 
  • वाईच्या विकासासाठी हातात हात घालून काम करूया : मकरंद पाटील 
 

Veer Jiwaji Mahale :  शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीर जीवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त वाई शहरासह त्यांच्या कोंढवली येथील जन्मभूमीत उत्साहाचे वातावरण होते. जन्मभूमीत ज्योत प्रज्वलन, स्मृतीस्थळाचे पूजन, वाई शहरातून भव्य शोभायात्रा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा विविध कार्यक्रमांतून त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यात आले. वीर जीवा महाले नाभिक संघटना, नाभिक समाज वाई आणि हिंदवी स्वराज्य भूषण वीर जीवाजी महाले उत्सव समिती, जन्मभूमी वाई–कोंढवली यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.कोंढवली येथे सकाळी १० वाजता स्मारक समितीचे अध्यक्ष गणपत चोरट यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष उमेश जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. वीर जीवाजी महाले यांच्या जुन्या वाड्याच्या जागेवर पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

ही ज्योत सिद्धेश्वर मंदिरात आणल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, स्मृतीस्थळावरील पादुका व पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शंकरराव मर्दाने, राजेंद्र चोरट, मोहिते सर आणि महेश जाधव यांनी जीवाजी महाले यांच्या जन्मभूमी व स्मारकाविषयी मनोगते व्यक्त केली. निनाद तावरे, संपतराव सूर्यवंशी, गायकवाड, अंबादास दळवी, राऊत, अखिल भारतीय जीवासेनेचे सोमनाथ काळे यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळ व वीर जीवा महाले नाभिक संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव आणि कोंढवली ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवकालीन वेशभूषेतील सहभागी हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले

कोंढवलीहून आणलेल्या ज्योतीचे वाई शहरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. घोड्यांवर स्वार झालेले मावळे, उंट, हलगी पथक, भगवे ध्वज आणि शिवकालीन वेशभूषेतील सहभागी हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. रवी सरांच्या मर्दानी खेळांच्या पथकाने चौकाचौकांत सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. महिला, युवक, बालगोपाळ आणि विविध समाजांतील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभायात्रा वीर जीवा महाले उद्यानात पोहोचल्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाई–खंडाळा–महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वीर जीवाजी महाले यांच्या वंशज सुमनअक्का बाळासाहेब सपकाळ (महाले) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

वीर जीवाजी महालेचें शौर्य आणि योगदान प्रेरणादायी

वीर जीवाजी महाले यांचे शौर्य आणि स्वराज्याच्या रक्षणातील योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मकरंद पाटील यांनी सांगितले. वीर जीवा महाले नाभिक संघटना व नाभिक समाजाच्या समाजोपयोगी उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी जीवाजी महाले यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांची स्वामिनिष्ठा आणि पराक्रमाचा आदर्श तरुणांनी जपावा, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, विवेक भोसले, स्वप्निल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष भिलारे, स्मारक समितीचे अध्यक्ष गणपत चोरट, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव मर्दाने आणि सातारा जिल्हाध्यक्ष अंबादास दळवी उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका निलिमा खरात, अपर्णा जमदाडे, नगरसेवक विजय ढेकाणे, प्रसाद बनकर, संग्राम पवार, भारत खामकर, शैलेंद्र देवकुळे, सुशील खरात, सनी चव्हाण, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड आणि युवा नेते प्रणव थोरवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. वाई, खंडाळा, लोणंद, फलटण, संगमनेर आणि नाशिक येथूनही नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव सहभागी झाले होते.

सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष उमेश आत्माराम जाधव, शहराध्यक्ष निनाद गोकूळ तावरे आणि तालुकाध्यक्ष संपतराव आनंदा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उत्सव समितीचे पदाधिकारी, नाभिक समाजबांधव आणि कोंढवली ग्रामस्थांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. अतुल सूर्यवंशी यांनी आभार मानले.

वाईच्या विकासासाठी हातात हात घालून काम करूया : मकरंद पाटील

वीर जीवाजी महाले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त मंत्री मकरंद पाटील आणि नगराध्यक्ष अनिल सावंत बऱ्याच दिवसांनंतर एकाच व्यासपीठावर आले. पाटील यांच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर झाल्यानंतर सावंत यांच्यासोबत झालेल्या या उपस्थितीने लक्ष वेधले. यावेळी पाटील यांनी सावंत यांना भावनिक साद घालत वाईच्या विकासासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हातात हात घालून काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या विकासासाठी आपले सहकार्य राहील, आवश्यक ती मदतही देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Web Title: Veer jiwaji mahale 391st birth anniversary grand procession wai makarand patil sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Vai News
  • Vaijapur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.