वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत.
वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत बसलेल्यांमध्ये मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.