Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी कार्तिकी भक्तजन येती! श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2025 | 02:35 AM
आषाढी कार्तिकी भक्तजन येती! श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर: आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.  या सोहळ्याला सुरवात झाली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसर व दर्शनरांग गजबजली आहे. आषाढी सोहळ्याकरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व दिंडया श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री.संत तुकाराम भवन व श्री.संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी व आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. रात्रीची ही दृष्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नांनंतर करण्यात आली असून, याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने विठूरायाची नगरी लखलखली असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळत आहे,  माय-बाप विठूरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण

फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण


आषाढी शुध्द एकादशी रविवार दि. 06 जुलै, 2025 रोजी आहे. या दिवशी पहाटे मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज दिनांक 17 जून रोजी वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

Web Title: Very beautiful decoration in shri vitthal rukmini temple pandharpur for ashadhi wari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • pandharpur
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी
1

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास
2

ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन
3

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर
4

Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.