
Vidarbha Weather, Nagpur Cold Wave,
हवामान खात्याच्या माहितीनुसार, किमान तापमान सरासरीपेक्षा ४.० अंशांनी कमी, तर कमाल तापमान २७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा २.३ अंशांनी कमी आहे. विभागाने १२ डिसेंबरपर्यंत अशाच थंडीचा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने १२ डिसेंबरपर्यंत नागपूरमध्ये हवामान असेच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात शहराचे किमान तापमान १२-१३ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहू शकते.
Pune Politics: आयाराम-गयाराम खेळ सुरू! भाजपमध्ये इनकमिंगमुळे कार्यकर्त्यामध्ये नाराजी वाढली
विदर्भात थंडीचा कडाका तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी नागपूर सर्वात थंड शहर ठरले. हवामान खात्याने १२ डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला असून, या काळात शहराचे किमान तापमान १२–१३° C आणि कमाल तापमान २७–२९° C दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
गोंदिया – ९.८° C
भंडारा – १०.०° C
यवतमाळ – १०.०° C
वर्धा – ११.२° C
वाशिम – ११.८° C
अमरावती – १२.६° C
ब्रह्मपुरी – १२.९° C
अकोला – १२.८° C
बुलढाणा – १३.२° C
चंद्रपूर – १३.२° C
उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागणार असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येईल. सोमवारपासून राज्यात शीतलहरींचा प्रभाव जाणवणार असून १०, ११ आणि १२ डिसेंबरला किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवार, ७ डिसेंबरपासूनच तापमानात घसरण सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात थंडीचा कडाका जास्त जाणवणार असून नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमानात काही अंशांची घट झाली असून थंडी वाढल्याचे चित्र आहे. हवामान विभागानुसार पुढील काही दिवसांत किमान तापमान १७ ते १८ अंशांवर, तर कमाल तापमान २८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बदलाचा थेट परिणाम पिकांवर जाणवत असून ज्वारीसाठी हवामान अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, याच हवामानाचा हरभरा पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. हरभऱ्यात रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, हेही आवाहन करण्यात आले आहे.