उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागणार असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येईल.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता.
सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. चक्रीवादळ डिटवा दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे.
दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.
तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत.
नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे यमुना बाजारातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि पुढील २४ तासांत दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तापमान ३६.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली असून नदी नाल्यांना पूर आला आहे. या परिस्थितीमध्ये नदी काठी असलेल्या मंदिरांमध्ये पाणी शिरले असून भाविकांसाठी काही मंदिरे बंद करण्यात आली आहेत.
सध्या पावसाची गती पुन्हा मंदावली आहे. विभागात ऑगस्ट महिन्यात संभाजीनगर जिल्ह्याने सरासरीदेखील गाठलेली नाही. तर धाराशिव जिल्ह्यात मात्र अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस कोसळला आहे.
आज अखेर उजनीतून तीन वेळा पूरनियंत्रणासाठी पाणी सोडले होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ९९.७८ टक्के ११७.१८ टीएमसी झाले आहे. तर दौंड येथून ३१०२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे.
IMD Weather Update : देशात मुसळधार पावसाच्या सरी सुरुच असून अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ज्यामुळे दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे.
सोमवारी रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडला असला तरी, आर्द्रतेमुळे लोकांचा श्वास कोंडत होता. हवामान खात्याने आजही ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला असून कोकण गोव्याला इशारा
देशाच्या विविध भागांमध्ये आज सकाळपासून पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यांना यलो तर काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वच राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सर्वच राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरूच आहे.