Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; “सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही”

RSS कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर झालेल्या राजकीय टीकेवर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडली. संविधानाशी निष्ठा असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 08:45 PM
संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; "सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही"

संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; "सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही"

Follow Us
Follow Us:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या राजकीय टीकेवर नव्याने नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे. आपण कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट करत संविधानाशी आपली कटिबद्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर पोलीस आयुक्त म्हणून काय असणार प्राधान्य?

नागपूर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नांगरे पाटील म्हणाले की, नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग मजबूत करणे तसेच महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.

ते म्हणाले, “आमच्या खांद्यावर IPS लिहिलेले आहे. त्यातील ‘S’ म्हणजे सर्व्हिस. त्यामुळे फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरले पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांनी नाही.”

“संविधानाशी पूर्ण निष्ठा, सर्व धर्मांच्या कार्यक्रमांना जातो”

RSS कार्यक्रमातील सहभागाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते गेली ३० वर्षे पोलीस सेवेत असून विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही सामान्य बाब आहे.

“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

“रमजान, जैन, शीख कार्यक्रमांनाही उपस्थित राहिलो”

नांगरे पाटील म्हणाले, “मी रमजान ईदच्या कार्यक्रमांना जातो, जैन आणि शीख समाजाच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहतो. त्याच परंपरेत मी या कार्यक्रमालाही गेलो होतो.”

त्यांनी सांगितले की, संबंधित कार्यक्रम १९ एप्रिल रोजी सानपाडा येथे झाला होता. त्या कार्यक्रमात जीएसटीविषयी मार्गदर्शन, आध्यात्मिक व्याख्याने आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली होती. आपण तेथे मानवी कल्याणासाठी प्रार्थना, ज्ञानेश्वरीतील विचार, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत तसेच पोलीस दलातील संधींबाबत भाष्य केले होते.

“सेवा शर्तींचे उल्लंघन केले नाही”

RSS कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने कोणत्याही शासकीय नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा पुनरुच्चार करत नांगरे पाटील म्हणाले, “माझी पूर्ण निष्ठा संविधान आणि त्याच्या मूल्यांशी आहे. त्या कार्यक्रमात जाऊन मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही.”

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

राज ठाकरेंची टीका काय होती?

यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “जर संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये प्रवेश करा,” असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला होता. या टीकेनंतर नांगरे पाटील यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Web Title: Vishwas nangare patil clarifies rss program controversy nagpur police commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • raj thackeray
  • Vishwas Nangre Patil

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.