Vishwas Patil became the president of the 99th akhil Marathi sahitya samelan news update
Vishwas Patil News : पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत नेहमीच चर्चा रंगलेली असते. आता लवकरच ९९ वे संमेलन होणार असून अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पानिपतकार म्हणून ओळख असलेले विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शतकपूर्वीच्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लोकप्रिय आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विश्वास पाटील यांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर मराठी साहित्य विश्वामध्ये एकच चैतन्य निर्माण झाले असून अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यसाठी क्लिक करा
र्वानुमते विश्वास पाटील यांची निवड
यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमान पद हे साताऱ्याकडे असणार आहे. राज्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या साताऱ्याकडे यंदाचे यजमान पद आहे. महामंडळाच्या चारही घटक संस्थासह संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विविध संस्थांनी सुचवलेल्या नावांवर सखोल चर्चा झाली. यात विश्वास पाटील यांच्या नावाला बहुतांश सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. त्यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये केलेल्या भरीव कामगिरी आणि साहित्य लेखनाबद्दल विश्वास पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. सर्वानुमते विश्वास पाटील यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विश्वास पाटील यांची साहित्यनिर्मिती
विश्वास पाटील यांनी दर्जेदार लेखनाची साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये पानिपत, महानायक , झाडाझडती या कादंबरी लिहिल्या आहेत. त्याचबरोबर नॉट गॉन विथ द विंड, आंबी, लस्ट फॉर लालबाग, गांधी : गीता, पांगिरा, चंद्रमुखी अशी अनेक कादंबरी लेखन केले आहे. त्याचबरोबर कलला चौक हा कथासंग्रह, चलो दिल्ली हा अनुवादित संग्रह आणि रणांगण हे नाटक लिहिले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनामध्ये घर तयार केले. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबऱ्यांची हिदी भाषांतरे देखील झाली आहेत. पानिपतला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार व कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारांसह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले. झाडाझडतीला १९९२चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.