मराठवाड्यातील 8 गावांचा हैदराबाद गॅझेटला नकार; काय आहे कारण?
Maratha Reservation News: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी सातारा गॅझेट लागू करण्यात येणार होते. त्यानुसार गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याचवेळी मराठवाड्यातील आठ गावांनी हैदराबाद गॅझेटला विरोध करत सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर नवा पेच उभा राहिला आहे. पण त्याचवेळी या गावकऱ्यांनी अशी मागणी का केली, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे
मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांनी सातारा गॅझेटनुसार प्रमाणपत्रे देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये हैदराबाद गॅझेटविषयी संभ्रम का निर्माण होऊ लागला आहे. असा सवाल उपस्थित होत आहे. पण गावकऱ्यांनी त्यामागचे कारणही सांगितले आहे. १९८२ पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील ९ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यात होता. त्यानंतर आता ८ही नऊ गावे धाराशिव जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
पोटाचा घेर होईल कमी! महिनाभर नियमित करा मध लिंबाच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
यासंदर्भात बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकार हैदराबाद गॅझेट की सातारा गॅझेट लागू करणार यासंदर्भात स्पष्ट माहिती द्यावी. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्याची माहिती देण्यात आली आहे. तर सातारा गॅझेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माहिती देण्यात आली आहे. १९८२पर्यंत ही गावे सोलपूर जिल्ह्यात होती. त्यामुळे या गावांना सातारा गॅझेट लागू होऊ शकते, असा दावा या गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे. गावकऱ्यांमुळे आता प्रशासन आता पेचात पडलं आहे.
कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नोंदींमध्ये मोडी लिपीतील पुरावे उपलब्ध असून, त्यावरून सातारा गॅझेटची मागणी होत आहे. आंबेजवळगा, कौडगाव, येडशी, जवळा, दुधगाव, कसबे तडवळा, गोपाळवाडी आणि कोंबडवाडी ही आठ गावे १९८२ पर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत होती. या गावांतील ग्रामस्थांना कुणबी नोंदी शोधण्यात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने माहिती स्पष्ट करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कपाळावर टक्कल पडण्याची भीती वाटते? मग सकाळच्या नाश्त्यात नियमित खा बीट आवळा डोसा, महिनाभरात
दरम्यान, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. समितीच्या बैठका वेग घेत असून, येत्या काही दिवसांत सातारा गॅझेट लागू करण्याची तयारी प्रशासन स्तरावर केली जात आहे. तर औंध गॅझेट लागू करण्याबाबतही चाचपणी सुरू असून, त्यातील नोंदींची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या भागातील मराठा कुणबी नोंदींबाबतची स्पष्टता लवकरच समोर येणार आहे.