Sanjay Raut alleges that Ravindra Dhangekar left Congress because of allegations against his wife
पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) तर चिंचवडमध्ये (Chinchwad Constituency) भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या जागी पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी 26 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आज कसबा आणि चिंचवड येथील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी माझ्या कामाची पावती मतदार देतील, असे म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
कसबा पेठ मतदारसंघात पदयात्रेद्वारे प्रचाराची सांगता केल्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत मी गेल्या तीस वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याची पावती मला मतदार देतील, असा विश्वास व्यक्त केला. ‘निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून जातीपातीचे धर्माचे राजकारण केले. मतदारांमध्ये फूट पाडण्याचे काम केले. परंतु, ते यशस्वी झाले नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांनी माझा प्रचार केला आहे. त्यांचे मी आभार मानतो’, असे धंगेकर म्हणाले.
पत्रकार परिषदेत शिंदे, थरकुडे आणि जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कसबा विधानसभा मतदारसंघात गेली सहा वेळा भाजपचे आमदार, याच मतदारसंघातून पालकमंत्री झाले, खासदार झाले, तरीही कसब्यातील प्रश्न सुटले नाहीत. महापालिकेत सत्ता असताना, महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष ही पदेही याच मतदारसंघातील नगरसेवकांना दिली गेली. याच मतदारसंघात भाजपचे 21 नगरसेवक होते, तरीही प्रश्न सुटले नाहीत, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी टीका केली.