
चंद्रकांत पाटील संवेदनशील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफावली असती का? असा सवाल रवींद्र धंगेकरांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या अमोल बालवडकरांवरती प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला जशास तसे उत्तर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडून ट्विट करून देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मदतीला शिवसेना धावली असे चित्र पुणे शहरामध्ये निर्माण झाले आहे. गुंडगिरी विषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी अमोल बालवडकर यांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हवे, असा खोचक टोला लगावला आहे.
“गुंडांसोबतच्या व्हायरल वीडियो मुळे अमोल बालवडकर यांचे तिकीट कापले”,असे चंद्रकांत पाटील काल एका सभेदरम्यान म्हणाले.
एवढे संवेदनशील चंद्रकांत पाटील असतील तर कोथरूड मधे गुंडगिरी फोफवली असती का?
आता सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ दिसत आहे.… pic.twitter.com/bzRUKBnGcr — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) January 11, 2026
निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमांमध्ये उदय सामंत यांनी स्टॉक सांभाळून ठेवण्याचा सल्ला धंगेकरांना दिला होता. शेवटच्या दोन दिवसात धंगेकरांनी स्टॉक बाहेर काढायला सुरुवात केली आहे, त्यामुळे भाजप- शिवसेना संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. रविंद्र धंगेकर यांनी यापूर्वीही पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते, या आरोपामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय तणाव उफाळून आला होता.
आता सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ दिसत आहे. गुंडगिरीविषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या पाटलांनी बालवडकर यांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हवं, अशी टीका रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. दिव्याखाली_अंधार म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यामुळे आता पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.