Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी

Wai News: वाईत शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागील रस्त्याची चिखल आणि खड्ड्यांमुळे दुरवस्था! राहुल चिंचकर यांची तहसीलदारांकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 11, 2026 | 04:46 PM
Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
Follow Us
Follow Us:
  • धान्य गोदामामागील रस्ता चिखलात
  • प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त
  • तातडीने दुरुस्तीची मागणी
वाई, दि. ११ : वाई पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागील रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ‘राहुल टायर्स’चे राहुल चिंचकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे चिंचकर यांचे टायर्सचे दुकान आहे. या मार्गावरून धान्य गोदामातील ट्रक तसेच अन्य वाहनांची सातत्याने ये-जा सुरू असते. मात्र, अनेक वर्षांपासून रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने रस्ता खड्डेमय आणि खराब झाला आहे. त्यातच पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने वाहनांची ये-जा धोकादायक बनली आहे.

राहुल टायर्समध्ये टायर्स खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनाही या खराब रस्त्याचा फटका बसत आहे. चिखलामुळे वाहने घसरण्याची शक्यता असून, एखादा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. धान्य गोदामातील अवजड वाहनांची सततची वाहतूक आणि रस्त्याच्या देखभालीचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला पाहणी व दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी चिंचकर यांनी केली आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीचे छायाचित्रेही त्यांनी अर्जासोबत जोडली आहेत.

रस्ता दुरुस्तीचा प्रश्न केव्हा सुटणार?

शासकीय धान्य गोदामासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज अवजड वाहनांची वर्दळ असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

Web Title: Wai grain godown road damage potholes tehsildar statement marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट
1

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.